आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ़ फार्मसी बोधेगाव येथील महाविद्यालयाने निकालाची परंपरा कायम राखली

0
143

शेवगाव प्रतिनिधी – निकेत फलके

नव महाराष्ट्र शिक्षण मंडळ,शेवगाव या संस्थेच्या आबासाहेब काकडे औषधनिर्माणशास्त्र पदविका विद्यालयाने निकालाची उत्तुंग परंपरा याही वर्षी कायम राखली आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांनी घेतलेल्या उन्हाळी परीक्षा 2021 मध्ये प्रथम व द्वितीय वर्गातील विद्यार्थ्यांचा 100% निकाल लागला.

यामध्ये प्रथम वर्षात कुमारी सानिया पठाण या विद्यार्थिनीने 87% गुण मिळवून प्रथम, कुमारी प्रियंका काशिद हिने 82.64% गुण मिळवून द्वितीय तर सोमेश्वर मोटकर याने 82.09% गुण मिळवून महाविद्यालयात तृतीय क्रमांक पटकावला. तसेच द्वितीय वर्षात कुमारी सोनाली आघाव या विद्यार्थिनीने 88.70% गुण मिळवून प्रथम, कुमारी रोहिणी खोटे हिने 87.70% गुण मिळवून द्वितीय व कुमारी प्रांजल खांडेकर हिने 86.80% गुण मिळवून महाविद्यालयात तृतीय क्रमांक पटकाविला.

या यशाबद्दल त्यांचे संस्थेचे सचिव ॲड. विद्याधरजी काकडे साहेब जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या विद्यार्थ्यांच्या यशाकरिता आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ़ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश मोकाटे परीक्षा विभाग प्रमुख मनचुके आशा,विभाग प्रमुख भाले शिवकन्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here