आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची निकालाची परंपरा कायम.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

शेवगाव प्रतिनिधी – सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ बी.एड्. द्वितीय वर्ष परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळाचे आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा निकाल ९७ टक्के लागला आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाविद्यालयाने निकालाची परंपरा कायम राखत गुणवंत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२०- २०२१ मध्ये बी.एड्. द्वितीय वर्ष विद्यापीठ परीक्षेमध्ये एकूण विद्यार्थ्यांपैकी ५१ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह ‘o’ (ओ) ग्रेड मध्ये प्राविण्य मिळविले आहे. यामध्ये कु.नागरगोजे वैशाली ८३.९० % गुण मिळवून प्रथम, कु.वाळुंजकर अनुराधा ८३.३८ % गुण मिळवून द्वितीय तर कु.झोटिंग स्नेहल हिने ८१.७३ % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकवला आहे.

महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे संस्थेचे अध्यक्ष अॅड. विद्याधर काकडे, जिल्हा परिषद सदस्या सौ.हर्षदा काकडे, शिक्षण विभागाचे प्रमुख प्रा.लक्ष्मण बिटाळ, महाविद्यालयाचे समन्वयक शिवाजीराव लांडे व प्राचार्य डॉ. रोहिदास उदमल्ले यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!