आमदार गडाख यांचे कट्टर समर्थक कचरे यांचा भाजपा मध्ये प्रवेश…

- Advertisement -

आमदार गडाख यांचे कट्टर समर्थक कचरे यांचा भाजपा मध्ये प्रवेश…

नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या प्रमुख उपस्थितीत कूकाना गावचे उपसरपंच व माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे कट्टर समर्थक असलेले सोमनाथ कचरे यांनी आज भाजपा पक्षाच्या संपर्क कार्यालयात आपल्या समर्थकांसह प्रवेश केला.

यावेळी त्यांना भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्ष पदीचे पत्र माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी सोमनाथ कचरे यांनी सांगितले की २०१४ ते २०१९ या काळात तालुक्याचा झालेला विकास तसेच २०१९ ते २०२४ या काळात झालेला तालुक्याचा झालेला विकास कामात मोठी तफावत असल्याचे सांगून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना पुन्हा तालुक्यात संधी देण्यासाठी सर्व सामान्य कार्यकर्त्यांची टाकत महत्त्वाची आहे.

हे सर्वसामान्यांचे नेतृत्व आहे तळागाळातील जनतेची त्यांच्यासोबत नाळ जोडलेली आहे .त्यांच्या विकास कामांकडे बघून मी आज स्वगृही परतल्याचे मत कचरे यांनी व्यक्त केले यावेळी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब गव्हाणे नेवासा तालुका प्रसिद्धीप्रमुख रितेश भंडारी आप्पासाहेब कावरे पांडुरंग कावरे सुरेश लिपणे अरुण गरड भागवत खराडे विकास भागवत. भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते चंपुशेट बोरा,अण्णा पाटील गव्हाणे,बाळासाहेब क्षीरसागर,अरुण गरड, मच्छिंद्र कचरे, अंबादास म्हस्के शिवसेना तालुका अध्यक्ष संजय पवार, गणपत खराडे डॉ.बाळासाहेब कोलते,राजू मिसाळ, तुकाराम कन्हेरकर,महेश कचरे संदीप जावळे ,सुरेश लीपणे,दत्तात्रय लांघे, उमेष चावरे, गणगे नाना,भागवत खराडे, आरूण चोपडे, सुरेश वाबळे, दत्तात्रय पोटे,किरण खाटीक, अनिकेत भारस्कर, बाबासाहेब पडूळे, शरद गरड आदी उपस्थित होते. इत्यादी उपस्थित होते यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles