एस.के.अकॅडमीचा खेळाडू भरत पवार याच्या ७१ चेंडूत ९२ धावा
नगर प्रतिनिधी – नगर शहरातील वाडिया पार्क येथे राज्यस्तरीय आमदार चषक 20-20 स्पर्धेमध्ये हुंडेकरी क्रिकेट संघ विरुद्ध पुनीत बालन या संघात रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात हुंडेकरी क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करीत पुनीत बालन संघासमोर १९.२ षटकात सर्व बाद १२८ धावांचे आव्हान उभे केले होते.पुनीत बालन या संघाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.
हुंडेकरी संघाकडून मोसिम काझी याने ३९ धावा,आदिल अन्सारी१९ धावा,अजय काळे १६धावा केल्या तर पूनित बालन संघाचे गोलंदाज अक्षय दरेकर,ऋषभ राठोड यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.
पुनीत बालन संघाकडून अनिकेत कुंभार ४३ धावा, ऋतुराज विरकर ३६ धावा,ओंकार खापरे २१ धावा केल्या,हुंडेकरी संघाकडून शाहरुख सय्यद याने २५धावा देत दोन विकेट घेतल्या,स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच वृषभ राठोड यांना देण्यात आला.
एस.के.अकॅडमी संघाविरुद्ध पिंपळगाव माळवी संघामधील सामन्यात एस.के अकॅडमी संघाने १५ धावांनी विजय मिळवला.एस.के अकॅडमी संघाने प्रथम फलंदाजी करीत २० षटकात ६ बाद १४५ धावांचे आव्हान पिंपळगाव माळवी या संघापुढे ठेवले तर पिंपळगाव माळवी या संघाने २० षटकात ९ बाद १३० धावांपर्यंत मजल मारली.
या सामन्यात एस.के.अकॅडमी यासंघाने १५ धावांनी विजय संपादित केला. एस.के. एकेडमी चा खेळाडू भरत पवार याने ७१ चेंडूत ९२ धावा करीत संघाच्या विजयासाठी मोलाची कामगिरी केली. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार भरत पवार यांना देण्यात आला.