आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस राज्यभर विविध सामाजिक उपक्रमाने साजरा.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

लवकरच आ.रोहित पवार युवा मंचाची स्थापना करणार – दत्तात्रय वारे.   

अहमदनगर प्रतिनिधी – कर्जत जामखेड चे विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध उपक्रम राबवत वाढदिवस साजरा करण्यात आला.

वाढदिवसानिमित्त हार, पुष्पगुच्छ, केक, शाल, फेटे, फटाके, फ्लेक्स बोर्ड इत्यादीं वस्तूंवर खर्च न करता फाटा देत गरजू गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी तसेच कुटुंबीयांसाठी धान्य वाटप, रक्तदान शिबिर,शाळेच्या विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटप करण्यात आले.

तसेच जामखेड राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष दत्तात्रेय श्रीराम वारे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी येथील स्नेहालय येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी उद्योजक आशिष खंडागळे, सागर कोल्हे, गणेश परभने, अक्षय वारे, रवींद्र वारे, ओमकार वारे, आदित्य आठरे आदि उपस्थित होते.

इतर खर्चाला फाटा देत एमआयडीसी येथील स्नेहालय येथे मिष्ठान्न भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

याप्रसंगी स्नेहालय चे प्रतिनिधी महेश अग्रवाल यांनी उपस्थितांना स्नेहालयच्या कार्यपद्धती व तेथे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती दिली तसेच उपस्थितांनी स्नेहालयाची पाहणी केली व तेथील इंग्रजी माध्यम विद्यालय व वस्तीगृह भोजनालय ग्रंथालय व सोयी सुविधा उपयुक्त हॉस्पिटल ठिकाणी भेट दिली.

तसेच रोहित पवार यांच्या कार्याने प्रेरित होऊन व स्फूर्तीने असेच सामाजिक उपक्रम राबवण्याचा नीचय युवकांनी केला आहे.तसेच लवकरच आमदार रोहित पवार युवा मंचाची स्थापना करण्यात येणार असल्याची भावना दत्तात्रय वारे यांनी व्यक्त करून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे सांगितले.

तसेच स्नेहालय संस्थेच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!