आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून कर्जत-जामखेडमध्ये कोट्यावधींच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा

0
116

कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे

कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार रोहित पवार केंद्र आणि राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून विविध योजनांची अंमलबजावणी आणि विकासकामे आपल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात पूर्ण करून घेत आहेत.

शनिवार,१३ नोव्हेंबर रोजी कर्जत आणि जामखेड शहरातील व तालुक्यातील विकासकामांचा एकत्रित भूमिपूजन सोहळा बाजारतळ, कर्जत आणि बाजारतळ जामखेड येथे आयोजित करण्यात आला आहे.

कर्जत-जामखेडला प्रगतीपथावर नेण्यासाठी आणि समृद्ध विकसित कर्जत-जामखेडची ओळख निर्माण करण्यासाठी आमदार रोहित पवार कार्यतत्पर आहेत.कर्जत-जामखेडमधील गेल्या अनेक वर्षांचा अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार रोहित पवार प्रयत्नशील आहेत.यापूर्वी कर्जत-जामखेडमध्ये गटा-तटाचं, जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात केलं जायचं, मात्र कर्जत-जामखेडकरांना आमदार रोहित पवारांनी दिलेल्या शब्दानुसार विकासाचं राजकारण सध्या मतदारसंघात चालू आहे.आमदार रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नांतून कोट्यावधींच्या योजनांना मंजुरी मिळवून मतदारसंघाच्या सातत्यपूर्ण विकासासाठी भरघोस निधी मंजूर करून घेतला आहे.

या सर्व विकासकामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता बाजारतळ, जामखेड आणि दुपारी दोन वाजता बाजारतळ, कर्जत येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (तथा मंत्री- वित्त व नियोजन विभाग), अशोकजी चव्हाण साहेब(मंत्री- सार्वजनिक बांधकाम विभाग), एकनाथजी शिंदे साहेब(मंत्री- नगरविकास विभाग), अब्दुलजी सत्तार साहेब(राज्यमंत्री- महसूल व ग्रामविकास विभाग), राज्यमंत्री दत्तमामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत विकासकामांचा एकत्रित भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.

“कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने मी निवडून आलेलो आहे. मागील कित्येक वर्षांचा कर्जत-जामखेड भागातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी जी विकासकामे मी करत आहे त्याला सरकार आणि सन्माननीय मंत्र्यांनी मला आवश्यक सर्व सहकार्य, पाठबळ आणि ताकत दिलेली आहे.या सन्मानीय मंत्र्यांना बघण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि आपल्या कर्जत-जामखेड मतदारसंघाच्यावतीने आभार व्यक्त करण्यासाठी आपण सर्वांनी जरूर उपस्थित राहावे.”

– आमदार रोहित पवार, कर्जत-जामखेड विधानसभा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here