श्रीगोंदा येथे 300 आंब्याचे वृक्षारोपण…
श्रीगोंदा प्रतिनिधी :- वृक्षतोडमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडू लागला आहे. यावर उपाययोजनांसाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक मोहत्सव समिती महाराष्ट्र शासन उपक्रम बरोबरच विविध सामाजिक संस्थांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
मात्र असाच प्रयत्न दिल्ली येथील आरना वधावन ही तरुणी करत असून तिने सीड बॉलच्या निर्मितीतून वृक्षारोपणावर भर देण्याचा नवा उपक्रम हाती घेतला असून ५५० सीड बॉल तयार करण्यात आले आहे. या उपक्रमाला लहान मुलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक मोहत्साव समितीच्या सहकार्याने तिने लहान मुलांना सीड बॉल कसे बनवायचे व याचे महत्त्व सांगून प्रत्यक्ष ५५० सीड बॉल बनवले. लहान मुलांना आतापासूनच सामाजिक कार्याची गोडी कशी लागेल, याबद्दल ती मार्गदर्शन करत आहे.त्याच बरोबर श्रीगोंदा येथे 300 आंब्याचे वृक्षारोपण ही तिने केले आहे.
जागतिक तापमान वाढत असून वृक्षतोड हे त्यामागील प्रमुख कारण आहे.त्यामुळे प्रत्येकाने आपण जी फळे खातो त्यांच्या बिया इतरत्र न टाकता त्यांचा संचय करून त्या सुकवायच्या.त्यानंतर माती व शेणखत किंवा गांडूळ खत एकत्र करून त्यामध्ये सुकलेल्या बिया एकत्र करून लाडू सारख्या आकाराचे सीड बॉल तयार करून पुन्हा सुकवायवे.सुकल्यानंतर हे सीड बॉल पाऊस पडून गेल्यावर आपल्या परिसरात तसेच माळरानात टाकायचे. काही दिवसांनी त्याला अंकुर फुटून वृक्षात रूपांतर होते.प्रत्येकाने वृक्षारोपण करून संवर्धन करणे गरजेचे आहे.
सामाजिक संस्था किंवा सोसायट्यांनी सीड बॉल तयार करून निसर्गात वृक्षांची लागवड करावी व डोंगरांची धूप थांबण्यासाठी प्रयत्न करावेत, त्याचबरोबर लोकांना जलप्रदूषनाचे धोके सांगून जलसाक्षरता मोहीम राबवून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आवाहन आरना वधवान करीत आहे.
तिच्या या निस्वार्थ कार्यास महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती,महाराष्ट्र शासन (उपक्रम) चे अध्यक्ष उमाजी बिसेन यांनी शुभेच्छा देवून कौतुक केले आहे.