अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या भिंगार शहराध्यक्षपदी आकाश अनिल तांबे यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या आदेशाने व जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे यांच्या नेतृत्वाखाली तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष साळवे यांनी तांबे यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या. आकाश तांबे यांचे सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात कार्य सुरु आहे. आंबेडकरी व बहुजन समाजातील युवकांची मोठी फळी त्यांच्यासोबत काम करत आहे. त्यांनी तीनशेपेक्षा जास्त युवकांसह पक्ष प्रवेश करुन, आरपीआयच्या माध्यमातून कार्य करण्यास पुढाकार घेतला आहे. त्यांचे युवकांमध्ये असलेले संघटन कौशल्य पाहून त्यांना भिंगार शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे साळवे यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना आकाश तांबे यांनी पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडून पक्षाचे ध्येयधोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निवडीबद्दल आरपीआयचे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, विभागीय अध्यक्ष भिमा बागुल, जिल्हा नेते महेंद्र साळवे, जिल्हा उपाध्यक्ष विजय भांबळ, प्रा. विलास साठे, शहर जिल्हा अध्यक्ष किरण दाभाडे, ज्येष्ठ नेते संजय कांबळे, नगरसेवक राहुल कांबळे, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, पारनेर तालुकाध्यक्ष राजू उबाळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजू जगताप, कर्जत तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, नगर तालुका कार्याध्यक्ष कृपाल भिंगारदिवे, अशोक केदारे, युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक भिंगारदिवे, टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष बंटी भिंगारदिवे यांनी त्यांचे अभिनंदन केले.