आरपीआय भविष्यातील सर्व निवडणुकांना स्वबळावर सामोरे जाणार – डॉ.राजेंद्र गवई

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील कराचीवाला नगर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ.राजेंद्र गवई यांच्या हस्ते झाले.यावेळी मोठ्या संख्येने युवकांनी आरपीआय मध्ये प्रवेश केला. तर युवकांची विविध पदावर नियुक्ती करण्यात आली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप,पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार दाभाडे,शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, शहर जिल्हा कार्याध्यक्ष दानिश शेख,युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, अल्पसंख्याक शहराध्यक्ष नईम शेख,संतोष पाडळे, शहर प्रवक्ता जमीर इनामदार,युवक शहराध्यक्ष ऋषी विधाते,अल्पसंख्याक शहर कार्याध्यक्ष आजीम खान, ग्रामपंचायत सदस्य संकेत कळकुंभे, युवक तालुकाध्यक्ष सचिन शिंदे,व्हीजेएनटी शहर जिल्हाध्यक्ष तुकाराम भंडारी, शहर सरचिटणीस विनीत पाडळे,शहर संघटक आफताब बागवान,शहर उपाध्यक्ष जावेद सय्यद,अल्पसंख्याक शहर उपाध्यक्ष अरबाज शेख,महिला जिल्हाध्यक्षा अलका बोर्डे, तृतीय पंथी आघाडी शहर जिल्हाध्यक्षा वर्षा रत्नपारखे, अमित गायकवाड, राकेश चक्रणारायण,भिम वाघचौरे आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली.पाहुण्यांचे स्वागत दानिश शेख यांनी केले.प्रास्ताविकात शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी दीन-दुबळ्या घटकांना आधार व पाठबळ देण्याचे कार्य आरपीआय करत आहे.वंचितांचे प्रश्‍न सोडविणे या प्रमुख उद्देशाने पक्षातील प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता योगदान देत आहे. वंचित व दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेने चालणार्‍या स्वाभिमानी आरपीआय पक्षात युवकांची संख्या वाढत आहे. शहरात सुशांत म्हस्के यांनी उत्तमपणे कार्य करुन पक्षाच्या माध्यमातून वंचित घटकांना न्याय देण्याचे कार्य करत आहे. आरपीआय भविष्यातील सर्व निवडणुकांना स्वबळावर सामोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार संग्राम जगताप यांनी आरपीआयच्या माध्यमातून युवकांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात आरपीआय मध्ये प्रवेश केलेल्या युवकांचे स्वागत करुन अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी गुलामअली शेख,ओबीसी आघाडी शहर जिल्हाध्यक्षपदी विजय शिरसाठ,अल्पसंख्याक शहर संघटकपदी निजाम शेख, महिला शहर जिल्हाध्यक्षपदी मयुरी वरपे,शहराध्यक्षपदी कविता जाधव,तालुका कार्याध्यक्षपदी संदीप वाघचौरे, तालुका उपाध्यक्षपदी निखिल शिंदे,भिंगार युवक शहराध्यक्षपदी राहुल सोळंकी, वैद्यकीय आघाडी शहर जिल्हाध्यक्षपदी इरफान खान, मातंग आघाडी शहर जिल्हाध्यक्षपदी शिवम साठे, शहर उपाध्यक्षपदी खलील शेख,मोहसीन खान,युवक जिल्हा उपाध्यक्षपदी विकी पवार,युवक शहर उपाध्यक्षपदी ऋषी पाडळे, विध्यार्थी आघाडी शहराध्यक्षपदी राहुल भिंगारदिवे,तृतीय पंथी आघाडी तालुकाध्यक्षपदी कल्याणी भांगे यांची निवड करण्यात आली.तसेच राहुल डोंगरे व विकी प्रभळकर यांनी आरपीआयमध्ये प्रवेश केला.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!