आरपीआय युवकची जिल्हा कार्यकारणी जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) युवकची जिल्हा कार्यकारणी राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर करण्यात आली. नुकतीच अहमदनगर शासकीय विश्रामगृह येथे आरपीआयच्या जिल्ह्यातील पदाधिकार्यांची बैठक पार पडली. यामध्ये युवकची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी विभागीय जिल्हाप्रमुख भिमराज बागुल, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, ज्येष्ठ नेते संजय कांबळे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, युवक शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक राहुल कांबळे, आय.टी. सेल जिल्हा संपर्क प्रमुख मंगेश मोकळ, मराठा आघाडीचे शशिकांत पाटील, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजा जगताप, कर्जत तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, पाथर्डी युवक तालुकाध्यक्ष महेश आंगारखे, उत्तरेचे युवक जिल्हाध्यक्ष सरपंच महेंद्र साळवी, ज्येष्ठ नेते विजय भांबळ, महिला जिल्हाध्यक्ष आरती बडेकर, नेवासाचे युवा नेते प्रकाश वाघमारे, विलास साठे, अक्षय भिंगारदिवे, वसंत भिंगारदिवे, आकाश तांबे, शफीक मोगल, जावेद पटेल आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीकांत भालेराव म्हणाले की, युवक ही आरपीआयची खरी शक्ती आहे. युवा शक्तीनेच समाजात परिवर्तन घडणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांच्या ध्येय, धोरणानूसार केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली कार्य करीत आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन पक्षाचे कार्य सुरु आहे. या कार्याने प्रेरित होऊन मोठ्या संख्येने युवक आरपीआयशी जोडला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी आरपीआयच्या सर्व युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सामाजिक कार्य करण्यास बळ देण्यात येणार आहे. वंचित घटकातील समाजाच्या न्याय, हक्कासाठी युवकांनी प्रयत्नशील रहावे. राजकारण करताना समाजाच्या विकासासाठी आरपीआय कटिबध्द असून, बाबासाहेबांची विचारधारा घेऊन संघटनेतील प्रत्येक कार्यकर्ता काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे म्हणाले की, वंचित घटकातील समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आरपीआय कटिबध्द आहे. सर्व समाजातील युवकांना पक्षात काम करण्याची संधी देण्यात आली आहे. ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आरपीआयच्या माध्यमातून दीन-दुबळे, मागासवर्गीयांना एक प्रकारे संरक्षण देऊन त्यांना विकासाच्या प्रवाहात आनण्याचे काम केले जात आहे. युवकांनी एका पक्षात एक झेंडा हातात घेऊन काम केल्यास समाजाचा विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्य करणार्या युवकांना पक्षामध्ये विविध पदाच्या माध्यमातून कार्य करण्याची संधी देण्यात आली आहे. नूतन कार्यकारणीत युवक जिल्हा उपाध्यक्षपदी नगर तालुक्यातून प्रविण वाघमारे, महादेव भिंगारदिवे, अक्षय गाडे, आशिष भिंगारदिवे, आकाश बडेकर, संदीप सकट, शेवगाव तालुक्यातून गौरव मगर, पाथर्डी तालुक्यातून प्रशांत बळीत, कर्जत तालुक्यातून विशाल काकडे तर युवक जिल्हा सरचिटणीसपदी दया गजभिये, गौतम कांबळे, युवक जिल्हा संघटकपदी नितीन निकाळजे, श्रीगोंदातून बापू भोसले, नगर तालुका युवक कार्यकारिणी उपाध्यक्षपदी महेश शिंदे, विलास साळवे, विशाल कदम, सरचिटनिसपदी निखिल सुर्यवंशी, संघटकपदी महेंद्र मोहिते यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या नूतन पदाधिकार्यांचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांनी अभिनंदन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!