नेप्तीत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्यमय जीवनासाठी मैदानी खेळाशिवाय पर्याय नाही. आरोग्य सदृढ असल्यास जीवन आनंदी बनते. कोरोनामुळे बंद झालेली क्रीडा मैदाने व खेळांच्या स्पर्धा सुरु झाल्या असून, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी गाव पातळीवर होणार्या क्रिकेट स्पर्धा कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
यावेळी महिलांच्या महाराष्ट्र संघातील खेळाडू श्रेया गडाख, पुणे विद्यापिठाचे कर्णधार अॅड. अजय शितोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर, माजी उपसरपंच सुभाष जपकर, ग्रामपंचायत सदस्य नितीन कदम, राजेंद्र कोतकर, मिठू कुलट, गणेश ठुबे, शुभम जपकर, रामदास फुले, महिंद्र चौगुले, गणेश वाघ, बाबासाहेब पवार, बाळासाहेब जपकर, कुमार होळकर, संतोष चौरे, गोरख फुले, सौरभ जपकर, सतीश होळकर, गोरख इंगोले, सोनू घेंबूड, सुरज साळुंके, हौशिराम जपकर, पांडूरंग मोरे, गणेश राठोड, विजय होळकर, सुनिल पवार, बहिरु होळकर, राजेंद्र होळकर, भाऊ कोतकर, मारुती कावरे, सार्थक कोल्हे, सागर कांडेकर, अक्षय होळकर, संदीप फुले आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायत सदस्य नितीन कदम यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.अनेक उत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेत सहभाग नोंदवत असून, गावातील युवक मैदानावर येण्यासाठी व निर्व्यसनी पिढी घडविण्याचा या स्पर्धेचा हेतू स्पष्ट केला.पाहुण्यांचे स्वागत गणेश ठुबे यांनी केले. महिलांच्या महाराष्ट्र संघातील खेळाडू श्रेया गडाख हिच्या हस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले. नारळ वाढवून व चेंडू टोलावून खासदार विखे यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले.
माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर म्हणाले की, खेळाने मन,खेळाडूवृत्ती आत्मसात करणारा युवक जीवनात यशस्वी होत असतो.युवकांनी मोबाईलच्या युगात मैदानी खेळाला चालना देण्यासाठी भरवलेली क्रिकेट स्पर्धा दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेत ग्रामीण व शहरी भागातील संघांचा समावेश असून, उत्कृष्ट संघांचे शानदार प्रदर्शन क्रिकेट रसिकांना पहावयास मिळत आहे.
मर्यादित क्रिकेट संघाचे सामने खेळविण्यात येत असून प्रथम विजेत्या संघास 31 हजार रुपये, उपविजेत्या संघास 21 हजार रुपये,तृतीय संघास 15 हजार रुपये व चतुर्थ संघास 11 हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह बक्षिस स्वरुपात देण्यात येणार आहे.
त्याचबरोबर उत्कृष्ट संघ व इतर उत्कृष्ट खेळाडूंना देखील आकर्षक रोख बक्षिस दिले जाणार आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नेप्ती ग्रामस्थ व युवक परिश्रम घेत आहे.