आरोपींना जलद गतीने फाशीची शिक्षा देण्याची मागणी.

0
45

मणिपूरला महिलाची विवस्त्र धिंड व बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन.     

अहमदनगर (प्रतिनिधी)-  मनिपुर राज्यात दोन महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यावर झालेल्या सामूहिक बलात्काराचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.

यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, महिला जिल्हाध्यक्षा गौतमीताई भिंगारदिवे यांच्या नेतृत्वाखाली नितीन कसबेकर, किरण जाधव, सोमा भाऊ शिंदे,स्वप्निल भिंगार दिवे,अक्षय बोरुडे, प्रज्ञाशील पाटेकर, मीरा गवळी,हिरा भिंगारदिवे,सुनिता घनवटे, रेखा साळवे, शोभा गाडे,पूजा बरके,रंजना भिंगारदिवे,लता बडे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच मणिपूर मध्ये सुरू असलेला हिंसाचार या अराजकतेस जबाबदार असलेले केंद्र सरकारच्या संवेदनशीलतेचा धिकार नोंदवून मणिपूर सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करुन आरोपींना जलद गतीने फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून मणिपूरमध्ये संघटित जमावाने दहशत निर्माण करण्याचा हेतूने तेथील तीन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढली व त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केलेला आहे. तीन महिलांपैकी एक महिला अद्यापही मिळालेली नसून या महिलेचा शोध घ्यावा मणिपूर मध्ये सुरू असलेल्या हिंसाचार व महिलांवर होणारा अत्याचार थांबवा, तेथे शांतता प्रस्थापित होण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पाऊल उचलण्याची गरज असल्याचे रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड म्हणाले. व महिलांच्या सुरक्षितेसाठी व बलात्कारींना फाशी होण्यासाठी नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here