आरोपींवर वाढीव ३०७ कलम लावण्यासाठी रिपाईची उपोषण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

खोसपुरी येथे बाचकर कुटुंबीयांवर झालेल्या जीवघेणा हल्ला प्रकरण

आरोपींवर जाणीवपुर्वक ३०७ कलम लावला नसल्याचा आरोप

अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख

खोसपुरी (ता. नगर) येथे बाचकर कुटुंबीयांवर जमावाने जीवघेणा हल्ला केला असताना या प्रकरणातील अरोपींवर हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल वाढीव ३०७ कलम लावण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजल सर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात पिडीत बाचकर कुटुंबीयांसह आमरण उपोषण करण्यात आले. आरोपींवर गुन्हा दाखल करताना पोलिसांनी जाणीवपुर्वक ३०७ कलम लावला नसल्याचा आरोप उपोषण कर्त्यांनी केला आहे.

या उपोषणात रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नईम शेख, प्रवक्ता जमीर इनामदार, उपाध्यक्ष जावेद सय्यद, संतोष पाडळे, राहुल बाचकर, यश शिंदे, भागवत बाचकर, विकास गाडे, शिवराज खंडागळे, महेश खरात, देवा रंधवे, अभिजीत चांदणे, प्रकाश काळे, दिपक काळे, बाबा सपकाळे, कमल काळे, फकीरा काळे, मंगल काळे, सुनिता बाचकर, अक्षय काळपुंड आदी सहभागी झाले होते.

खोसपुरी येथे सुनिता बाचकर यांची दोन एकर शेत जमीन आहे. त्यांनी शेतीमध्ये बाजरी लावली आहे. या शेतामध्ये देवकर कुटुंबीय सातत्याने त्यांची जनावरे चरण्यासाठी सोडत असल्याने बाचकर यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. पिकांचे नुकसान होत असल्याने त्यांनी अनेकवेळा देवकर कुटुंबीयांना सदर जनावरे शेतात न सोडण्याचे सांगितले. तरी देखील दि.१ सप्टेंबर रोजी देवकर कुटुंबीयांनी त्यांचे जनावरे बाचकर यांच्या शेतात चरण्यासाठी सोडले.

सुनिता बाचकर यांनी देवकर यांच्या घरी जाऊन जाब विचारला असता देवकर कुटुंबीयांच्या सदस्यांनी सुनिता बाचकर, प्रकाश काळे, कमल काळे, फकिरा काळे, राहुल बाचकर यांना धारदार शस्त्र व लाठी-काठीने मारहाण केली. यामध्ये सुनिता बाचकर यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्या जागीच बेशुध्द झाल्या. त्यांना उपचारासाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी भारत देवकर, जया देवकर, गेणाजी देवकर, कुसुम देवकर, श्‍वेता देवकर, संध्या देवकर यांच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र बाचकर कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला होऊन देखील आरोपींवर पोलिसांनी ३०७ कलम लावले नसल्याने, आरोपींवर ३०७ वाढीव कलम लावण्यासाठी उपोषण करण्यात आले.

देवकर कुटुंबीयांचा गावात दबदबा असल्याने पोलीसांनी बाचकर कुटुंबीयांची दखल घेतली नाही. तसेच जबाब लिहून घेताना त्यांच्या मुलाला व कोणत्याही सदस्यांना पाहू दिले नाही. गावातील पोलिस पाटील देखील देवकर यांचे नातेवाईक असल्याने सर्वसामान्य कुटुंब असेलेल्या व मारहाण झालेल्या बाचकर यांची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप रिपाईच्या वतीने करण्यात आला आहे.

पिडीत कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी सदर अरोपींवर हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल वाढीव ३०७ कलम लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!