आर्किटेक्टस्, इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असो यांच्या वतीने सभासद यांच्या  साठी ऐतिहासीक वस्तू संग्रहालय  येथे भेटीचे आयोजन

- Advertisement -

आर्किटेक्टस्, इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असो यांच्या वतीने सभासद यांच्या  साठी ऐतिहासीक वस्तू संग्रहालय  येथे भेटीचे आयोजन

शहरातील जुन्या वास्तू जतन केल्यास अहमदनगर शहराला देशातील मुख्य पर्यटन स्थळाचा दर्जा मिळू शकतो – भूषण देशमुख

 

अहमदनगर प्रतिनिधी : एसा सभासद आणि नगर वासियांसाठी शहराच्या स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला ऐतिहासिक वस्तू संग्रहालय आणि संशोधन केंद्र येथे भेट.

आर्किटेक्टस्, इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असो अहमदनगर आणि पोलाद स्टील जालना यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे सभासद आणि नगरवासियांसाठी साठी ऐतिहासीक वस्तू संग्रहालय आणि संशोधन केंद्र येथे भेटीचे आयोजन करण्यात आले होते तसेच जेष्ठ पत्रकार आणि अहमदनगर इतिहास प्रेमी भूषण देशमुख यांचे अहमदनगर मधील जुने वास्तू वैभव आणि काळानुरुप त्याची जडणघडण या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. नविन पिढीतील युवकांना तसेच नागरिकांना आपल्या शहराचा इतिहास माहिती व्हावा या उद्देशाने एसाने पोलाद स्टील जालना यांच्या सहकार्याने या भेटीचे आयोजन केले होते.

हजारो वर्षांपूर्वीच्या शहरातील जतन करून ठेवलेल्या वस्तूंची संग्रहालयात भेट देऊन माहिती या निमीत्ताने उपस्थितांना झाली. डॉ रवींद्र साताळकर आणि विश्वस्त मंडळ यांच्या प्रयत्नांमुळे मागे या वस्तू संग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात आले डॉ संतोष यादव व संचालक चांगल्या प्रकारे त्या वस्तूंचे जतन करून नगरचा इतिहास भेट घेणाऱ्या नागरिकांना सांगत आहेत. यावेळी बोलताना भूषण देशमुख यांनी अहमदनगर शहराला पाचशे पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असून स्थापना दिनाची तारीख माहिती असलेल्या मोजक्या शहरात आपली गणना होत असल्याचे नमूद केले. आपल्या शहराचे नाव शेकडो वर्षांपूर्वी जगातील व्यापारात आणि वास्तू वैभव असलेल्या शहरांमध्ये अग्रस्थानी होते.

निजामशाहीच्या काळात शहरात भव्य वास्तू वैभव आपल्या शहराला लाभले यामध्ये त्या काळात केलेली शहरात पाणी पुरवठा करण्यास असलेली खापरी नळ योजना याचे उत्तम उदाहरण असून अजूनही त्याचे अवशेष आपल्याला खोदकामात आढळून येतात. भुईकोट किल्ल्याची भक्कम तटबंदी, नैसर्गिक दृष्ट्या जागेची निवड आणि अभेद्य असे बांधकाम या स्थापत्य कलेचा अनोखा नमुना आहे. यामध्ये झुलता पूल, प्रवेश द्वार, सर्व बाजूने संरक्षणासाठी पाणी सोडण्याची व्यवस्था उल्लेखनीय असल्याचे देशमुख यांनी नमूद केले. त्याचबरोबर बागरोजा, दमडी मस्जिद, सलाबत खानाची कबर, फराह बक्ष महल, कोठला, मांजरसुंबा, कोतवाली जुनी इमारत आणि घुमट, मुलुख मैदान तोफ, दिल्लीगेट व माळीवाडा वेश, ह्युम चर्च, मेहेर बाबा येथील विविध बांधकामे अश्या वस्तूचे उत्कृष्ट नमुने असलेल्या इमारती शेकडो वर्षापासून शहराच्या वैभवात भर घालत आहेत.

यात प्रामुख्याने काळा पाषाण दगडाचा वापर केलेला दिसून येतो. हा ऐतिहासीक वारसा योग्य प्रकारे जतन केल्यास आणि यास प्रसिध्दी दिल्यास जगभरातून पर्यटक तो पाहण्यास आपल्या शहरात येतील. शहरात आमूलाग्र बदल करण्यास आणि पर्यटनास वाव देण्यास नक्कीच यांचा उपयोग स्थानिक प्रशासनाने केला पाहिजे असे देशमुख यांनी नमूद केले. संस्था सचिव प्रदिप तांदळे यांनी संस्था समाज प्रबोधन आणि नवीन पिढीला शहराचा इतिहास माहिती होण्यासाठी असे उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. पोलाद स्टील कंपनीचे आशिष भाबडा, यश दायमा, सुशांत गव्हाणे  आणि आदेश गूंगे यांचे सहकार्य हा उपक्रम करण्यास लाभले.

या उपक्रमास संस्था अध्यक्ष रमेश कार्ले, सुनिल औटी, प्रितेश पाटोळे, संजय दळवी, सुरेंद्र धर्माधिकारी, संजय चांडवले, अजय दगडे, इक्बाल सय्यद, अनिल मुरकुटे, रत्नाकर कुलकर्णी, मीनल काळे, एन डी कुलकर्णी, विशारद पेटकर, स्वरूपा शहापूरकर, किरण टकले यांच्यासह सभासद, कुटुंबीय आणि नगरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यश शहा यांनी केले तर संचालक अन्वर शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!