आर्किटेक्ट इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असो. अहमदनगरच्या वतीने सभासदांसाठी ओव्हर ब्रीज साइट व्हिजीट चे आयोजन संपन्न
फ्लाय ओव्हर आणि रेल्वे ओव्हर ब्रीज सारख्या कामांनी शहरातून होणाऱ्या वाहतूक आणि दळण वळण सुसह्य – इंजि. लुईस शेळके
नगर : आर्किटेक्ट इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असो. अहमदनगर आणि श्री सत्य साईबाबा इंफ्रा यांच्या संयुक्त विद्यमाने सभासदांसाठी व्ही आर डी ई जवळ दौंड रोड येथे रेल्वे ओव्हर ब्रीज साइट व्हिजीट चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री सत्य साईबाबा इन्फ्राचे या प्रोजेक्टचे इन्चार्ज लुईस शेळके यांनी पी एस सी आय गर्डर टेन्शनिंग स्ट्रेसींग काम याचे प्रात्यक्षिक दाखविले त्याचबरोबर आय गर्डर लॉन्चिंग, फाऊंडेशन कामाची पद्धती , गर्डर चे रैन्फोर्समेंट आणि शिथिंग पाइप प्रोफाइल, गर्डर चे ग्राऊटिंग याविषयी सविस्तर माहिती दिली.
पुढील एक वर्षामध्ये या रेल्वे ओव्हर ब्रीज कन्स्ट्रक्शन पूर्ण होणार असून त्यानंतर तो वापरासाठी सर्वांना खुला केला जाईल. दिवस रात्र या पुलाचे काम चालू असून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी याचा चांगला उपयोग होईल. संस्था अध्यक्ष रमेश कार्ले यांनी शहर आणि जिल्ह्यात काम करणारे संस्था सभासद यांना आपल्या शहर हद्दीत चालू असलेल्या कामाची तांत्रिक माहिती होणे आवश्यक असल्याने या तांत्रिक व्हिजीट चे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
या व्हिजीट साठी भूषण पांडव यांनी पुढाकार घेतला तसेच संस्था उपाध्यक्ष आदिनाथ दहिफळे, सचिव प्रदीप तांदळे, अशोक सातकर, प्रशांत आढाव, नागेश खुरपे, संभाजी वाघ, वैशाखी हिरे, अभिजित देवी, सचिन डागा, सदानंद कुलकर्णी, कैलाश ढोरे, संतोष खांडेकर, राजू गवळी गिरीश धोत्रे आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisement -