आर्किटेक्ट इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असो,च्या वतीने आर्च क्रांती फॉर बेटर फुचर या विषयावर व्याख्यान संपन्न 

- Advertisement -

आर्किटेक्ट इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असो,च्या वतीने आर्च क्रांती फॉर बेटर फुचर या विषयावर व्याख्यान संपन्न

आर्च, डोम आणि स्थानिक बांधकाम साहित्याचा वापर पर्यावरण पूरक सदृढ शहर विकासासाठी आवश्यक – आर्की. प्रविण माळी 

नगर :  सध्याच्या काळात शहरे काँक्रिटच्या जंगलात रूपांतरित झाल्यासारखी वाटत असून सिमेंट आणि स्टील यांचा अवाजवी वापर प्रदूषणाच्या माध्यमातून आपले आरोग्य धोक्यात आणत आहे. यासाठी उपलब्ध असलेल्या नैसर्गिक बांधकाम साहित्याचा जास्तीत जास्त वापर बांधकामासाठी करणे आवश्यक आहे. सध्या पाण्यानंतर काँक्रिट हे दोन नंबरवर आहे की जे सर्वात जास्त प्रमाणात वापरले जात आहे. पर्यावरणपूरक वातावरणात राहण्यासाठी निसर्गात उपलब्ध होणारे साहित्य वापरणे आवश्यक असून त्यासाठी आर्किटेक्ट इंजिनीअर्स यांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन वास्तू विशारद प्रविण माळी यांनी केले.
आर्किटेक्ट इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असो. अहमदनगर आणि एस आर जे स्टील यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथील प्रथितयश आणि नामवंत वास्तू विशारद प्रविण माळी यांचे आर्च क्रांती फॉर बेटर फुचर या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी संस्था अध्यक्ष रमेश कार्ले, सहायक संचालक नगर रचना विभाग पुनम पंडित, सचिव प्रदीप तांदळे,आर्की. तेजस्विनी तोरडमल, आर्की. राज कदम, आर्की. वेदांत मिठारी, भूषण देशमुख, संजय चांडवले, सुरेंद्र धर्माधिकारी, प्रल्हाद जोशी, नंदकिशोर घोडके, वैभव देशमुख, स्वप्नील बोऱ्हाडे, आदिनाथ दहिफळे, अन्वर शेख, मयुरेश देशमुख, उदय तरवडे, संकेत पादिर, संचालक यश शहा, प्रितेश पाटोळे, सुनिल औटी, संजय कटारिया, प्रेरणा कटारिया, पायल शहा आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान प्रविण माळी यांनी जेष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांच्यासह नगर मधील सलाबत खान कबर, दमडी मस्जिद, बूथ हॉस्पिटल, जनरल पोस्ट ऑफिस, ह्युम चर्च, फराह बक्ष महल, रणगाडा संग्रहालय अश्या ऐतिहासिक आणि बांधकामाचे उत्कृष्ट उदाहरण असलेल्या इमारतींना भेट दिली. यावेळी त्यांनी अहमदनगरला अतिशय समृद्ध असा वास्तूंचा वारसा असून पुरातत्व विभाग आणि इतर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून तो जतन करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. याचा उपयोग शहरातील प्रतिनिधी आणि सेवाभावी संस्था यांनी पर्यटन विकास करण्यासाठी करण्याचा मानस व्यक्त केला.
यावेळी बोलताना मुख्य अतिथी सहायक संचालक नगर रचना विभाग पुनम पंडित यांनी आपला ऐतिहासिक वारसा जतन करणे आणि या प्रकाराची बांधकामे करत राहणे आवश्यक असल्याचे नमूद करून संस्था सभासदांना या उपक्रमाच्या माध्यमातून जागरूक करण्याचा स्तुत्य प्रयोग करत असल्याचे नमूद केले.
संस्था अध्यक्ष रमेश कार्ले यांनी सांगितले की, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात प्रविण माळी यांनी आर्च, डोम, एक्सपोज ब्रिक्स वर्क, झाडांचे लाकूड असे विविध प्रयोग करून विविध बांधकाम प्रकल्प उभारले आहेत.तसेच याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम केले आहे. त्याचप्रमाणे संस्था सभासद यांनी पर्यावरण पूरक बांधकामावर जास्तीत जास्त भर द्यावा असे आवाहन केले.
यावेळी संचालक यश शहा यांचा अखिल भारतीय जैन दिवकर मंच नवी दिल्ली मध्ये राष्ट्रीय युवा कार्याध्यक्ष  पदी तसेच जैन समाज आणि इतर सेवाभावी संस्थांवर विश्वस्त पदी निवड झाल्याबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव प्रदीप तांदळे यांनी केले, व पाहुण्यांचा परिचय आर्किटेक्ट मयुरेश देशमुख यांनी करून दिला,तर आभार यश शहा यांनी मानले.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!