इंजिनीयर्स सभासदांनी संगीताच्या माध्यमातून सभासदांची मने जिंकली
सभासदांना कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून दिले : अध्यक्ष विजयकुमार पादीर
अहमदनगर प्रतिनिधी :- लहू दळवी
गेल्या दोन वर्षापासून कोरोणाचे महाभयंकर संकट आपल्यावर ओडवले होते. या काळामध्ये आपण कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले नव्हते. परंतु कोरोणाचे संकट हळूहळू दूर होत असल्यामुळे असोसिएशनने कोजागिरी पौर्णिमेचा सुरु असलेला कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.
इंजिनीयर्स सभासद आपला व्यवसाय सांभाळून आपल्या मध्ये असलेले कलेच्या माध्यमातून गाण्यांचे सादरीकरण करून सभासदांचे मने जिंकली सभासदांच्या कुटुंबासाठी व आपली संस्कृती व परंपरा टिकावी यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन या पुढील काळातही केले जातील असे प्रतिपादन असोशियनचे अध्यक्ष विजयकुमार पादीर यांनी केले.
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त संजोग हॉटेल येथे आर्किटेक्स् इंजिनिअर्स अँड सर्व्हिअर्स असोशियन ( एसा ) व पोलाद स्टील यांच्या संयुक्त विद्यमानाने संगीताच्या मैफिलीने कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरा केली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार पादीर, उपाध्यक्ष नंदकुमार बेरड, सचिव अन्वर शेख, प्रदीप तांदळे, भूषण पांडव,बाळासाहेब पवार, संजय चांडवले, किरण वाघे, प्रथमेश सोनावणे, शेखर आंधळे, पोलाद स्टील कंपनीचे मॅनेजर विजय दगडे, सुशांत गव्हाणे, यश दायमा तसेच संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त संस्थेचे सर्व सभासद कुटुंबासह एकत्र येऊन कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी केली जाते.यामध्ये काही सभासद आपली कला सादर करीत असतात.
यामध्ये गायक अजय दगडे, सुनील हाळगावकर, मनोज जाधव, अजित माने, सतीश कांबळे, नंदकिशोर घोडके, उमेश जेऊरे यांनी हिंदी व मराठी सिनेमातील जुने गाण्यांचे सादरीकरण केले.तसेच बाबूजी ससाणे, सचिन शिरसागर यांनी वादनाची कला सादर केली व सभासदांचे मने जिंकली.
कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन अन्वर शेख यांनी केले. व सांस्कृतिक समितीचे प्रमुख अजय दगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.