आष्टी तालुक्यातील सुरुडी फाट्यावर रूग्णवाहिका आणि कारची समोरासमोर धडक;एक जागीच ठार,तीन गंभीर जखमी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

धामणगाव,आष्टी ( बीड) – बीडवरून कोल्हापुरकडे जात असलेली भरधाव कार आणि नगरवरून बीडकडे येत असलेल्या रूग्णवाहिकेची समोरासमोर जोराची धडक झाल्याची घटना आज सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान धामणगाव रोडवर सुरुडी फाटा येथे घडली.

अपघातात कार मधील एक जण जागीच ठार झाला तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अवधुत नंदकुमार गरगटे रा.इचलकरंजी (३१) असे मृताचे नाव आहे.सोमवारी दुपारी पुण्याला रूग्ण घेऊन  गेलेली रूग्णवाहिका (MH.20,EG.5130) रुग्णास सोडून आज पहाटे बीडला परत येत होती.तर बीडवरून एक कार (MH.09 BM.5986 ) कोल्हापूरकडे सकाळी निघाली होती.

दरम्यान, आज सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान सुरुडी फाट्यावरील वळणावर कार आणि रुग्णवाहिका यांची समोरासमोर धडक जोरदार धडक झाली.

अपघातात कार मधील अवधुत गरगटे हा जागीच ठार झाला.तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना तातडीने अहमदनगर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.मात्र,जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.रूग्णवाहिका चालक संतोष सुरवसे (रा.बीड ) हा किरकोळ जखमी झाला आहे.

यावेळी अपघातग्रस्तांना धामणगाव पंचायत समिती सदस्यपती रावसाहेब लोखंडे यांनी त्यांची रुग्णवाहिका पाठवून मदत केली.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!