आ.रोहित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कर्जत शहरात शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
93

कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्जत शहर यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवला याचे उद्घाटन बारामती ऍग्रो च्या विश्‍वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी थोर संत सावता महाराज यांचे वंशज रमेश महाराज वसेकर, कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, नामदेव राऊत, युवक अध्यक्ष नितीन धांडे, उद्योजक दीपक शिंदे, संयोजक सुनील शेलार व विषाल मेहेत्रे, प्रवीण घुले, मोहनराव गोडसे, दादासाहेब थोरात, सचिन कुलथे, मनीषा सोनमाळी,डॉक्टर शबनम इनामदार, उषा राऊत, ऋषिकेश धांडे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी शहर काँग्रेसच्या वतीने कर्जत शहर व परिसरातील सर्व प्राथमिक शाळा मध्ये सकाळी जाऊन उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य यामध्ये वह्या कंपास पेटी रंग पेटी यासह इतर सर्व साहित्यांचे वाटप केले.

या उपक्रमांमध्ये शहराध्यक्ष सुनील शेलार प्रसाद  ढोकरीकर,माजी उपनगराध्यक्ष बापूसाहेब नेटके, युवक शहराध्यक्ष विषाल मेहेत्रे, लालासाहेब शेळके भूषण ढेरे, राहुल खराडे,देवा खरात दत्ता ढवळे यांनी मोलाचे योगदान दिले.

यावेळी बोलताना सुनंदा पवार म्हणाल्या की,आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी शहर शाखेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आमदार रोहित पवार यांना अशाच पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवली जावी अशी अपेक्षा आहे नुकताच पुणे येथे सूजन संस्थेमधील शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटपासंदर्भात बैठक आयोजित केली होती त्या त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला या निर्णयाची अंमलबजावणी सर्वत्र अतिशय चांगल्या पद्धतीने झाली आहे.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष सुनील शेलार म्हणाले की कर्जत जामखेड चे लाडके आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे शहर शाखेच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप कर्ज शहरातील व नगरपंचायत हाती मधील सर्व प्राथमिक शाळा यांना करण्यात आले आहे आगामी काळामध्ये देखील अशाच पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवले जातील.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विशाल मेहेत्रे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here