आ.संग्राम जगताप यांच्या कार्यावरील ‘विकासाचे संग्रामपर्व’ पुस्तिकेचे आज प्रकाशन

- Advertisement -
अहमदनगर प्रतिनिधी : नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या विधानसभेतील कार्यकाळास ८ वर्षे पूर्ण होत आहेत.याशिवाय त्यांचा वाढदिवसही १२ जून रोजी साजरा होत आहे.लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी नगर शहरात केलेल्या विकासकामांचा आढावा घेणारी विकासाचे संग्रामपर्व ही पुस्तिका साकारण्यात आली आहे.
या पुस्तिकेचे प्रकाशन आज शनिवार दि.११ जून रोजी सायंकाळी ६ वाजता सहकार सभागृहात प्रख्यात सरकारी वकील ऍड.उज्वल निकम यांच्या हस्ते व सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे,अशी माहिती हाऊस फुल्ल प्रतिष्ठानचे अमोल खोले यांनी दिली.
राजकारण, समाजकारणात कार्यरत असलेल्या व्यक्तींकडून सर्वांच्याच खूप अपेक्षा असतात.त्यांच्या कार्याचे मोजमाप हे विकासकामांवरुन ठरते.अतिशय तरुण वयात समाजकारण, राजकारणात ठसा उमटवत आ.संग्राम जगताप यांनी नगरला महानगरच्या दिशेने नेण्याचा संकल्प केला आहे.त्यांच्या संकल्पसिध्दीची वाटचाल सर्वांसमोर चित्रशब्द रुपाने यावी यासाठी हाऊस फुल्ल प्रतिष्ठानने पुढाकार घेत या पुस्तिकेची निर्मिती केली आहे.
यात आ.जगताप यांचा राजकीय प्रवास, नगर शहरात मागील दशकभरात झालेली विकासकामे तसेच भविष्यात होणारे मोठे प्रकल्प याचा समग्र आढावा घेण्यात आला आहे.कोविड महामारी काळात आ.जगताप यांनी केलेले भरीव काम व त्यातून सर्वसामान्यांना मिळालेला आधार या पुस्तिकेतून सर्वांसमोर येणार आहे. याशिवाय शहरातील सामाजिक तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींनी आ.जगताप यांच्या कार्यशैलीबाबत व्यक्त केलेली मतेही लेख रुपाने वाचायला मिळणार आहेत.
नेतृत्वाने ठरवले तर शहराचा खरोखरच कायापालट कसा होवू शकतो याची प्रत्यंतर प्रत्येकाला पुस्तक वाचल्यावर नक्कीच येईल. आ.जगताप यांच्या कार्यपध्दतीचे वेगवेगळे पैलू छायाचित्र व शब्द रुपाने मांडण्याचा प्रयत्न या पुस्तिकेत करण्यात आलेला आहे.या प्रकाशन सोहळ्यास नगरकरांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन हाऊस फुल्ल प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!