आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून महिला दिनानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भवनाचा लोकार्पण सोहळा संपन्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

ज्येष्ठ महिला भवनाच्या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण करतील – उपमहापौर गणेश भोसले

 

अहमदनगर प्रतिनिधी – महिला आता चूल व मूल एवढ्यापुरत्या मर्यादित न राहता महिलांनी आपापल्या क्षेत्रांमध्ये कामाच्या माध्यमातून ठसा उमटवला आहे.विनायक नगर येथे आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भवन व जिम चा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे.

या भवनाच्या माध्यमातून महिलांना एकत्रित येऊन आपल्या विचाराची देवाण-घेवाण करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले आहे.आपण समाजामध्ये वावरत असताना आपल्या शहराशी,राज्याशी व देशाचे काहीतरी देणे लागते या भावनेतून आपण काम केले पाहिजे स्वच्छतेबाबत सर्वांनी पुढे येऊन लोकचळवळ उभी करावी व आपला परिसर स्वच्छ सुंदर व हरित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.

आ.संग्राम जगताप यांनी उपमहापौर पदावर काम करण्याची संधी दिली या संधीच्या माध्यमातून मी आपले कर्तव्य पार पाडत आहे शहराच्या व प्रभागाच्या विकासासाठी आम्ही चारही नगरसेवक कटिबद्ध राहू ज्येष्ठ महिला भवनाच्या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण करतील असे प्रतिपादन उपमहापौर गणेश भोसले यांनी केले.

विनायक नगर येथे आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर भवनाचा लोकार्पण सोहळा नगरसेविका शितल ताई जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी उपमहापौर गणेश भोसले,मनपा महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती मीनाताई चोपडा, नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक संजय चोपडा,संगीता भोसले, रुक्मिणी नन्नवरे, अश्विनी टाक, अनुराधा भोयरे, कांता फसले, अरुणा गांधी, संगीता वांडेकर, मीरा खैरे, सीमा खापरे, अश्विनी भोसले आदी उपस्थित होते.

रुक्मिणी नन्नवरे म्हणाल्या की, उपमहापौर गणेश भोसले यांनी महिलांना एकत्रित येण्यासाठी अहिल्यादेवी होळकर या नावाने भवन तयार करून दिले आहेत या भवनाच्या माध्यमातून महिलांचे विविध प्रश्न सोडवण्याचे काम आम्ही महिला करू या भवनाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहेत याच बरोबर अध्यात्मिकता व धार्मिकता वाढवण्यासाठी मदत होणार आहे.

भवनाच्या उद्घाटनाप्रसंगी महिला दिनाचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गेल्या दोन वर्षापासून कोविड च्या महाभयंकर संकटातून आपण सर्वजण बाहेर आलो आहे.यापुढील काळात आपले विविध सण उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडू असे त्या म्हणाल्या.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!