आ.संग्राम जगताप यांच्या माध्यमातून शहरातील 145 शाळांना ई-लर्निंग सॉफ्टवेअर व एलइडी स्मार्ट टीव्हीचे वाटप

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

विकास कामांबरोबरच शिक्षण, कला,क्रीडा व संस्कारित शहर निर्माण करायचे – आ.संग्राम जगताप

अहमदनगर प्रतिनिधी – भारत देश हा महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. भविष्याकाळात विद्यार्थ्यांच्या जोरावर देश महासत्ता होण्यास मदत होणार आहे. यासाठी शहरातील गरजू विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग व्हावा यासाठी 145 शाळांना ई लर्निंग सॉफ्टवेअर असलेले स्मार्ट एलईडी टीव्ही देण्यात आले आहे. खाजगी शाळेतून ई लर्निंग सुविधा सुरू झाली आहे.सर्व शाळानमध्ये ही सुविधा सुरू व्हावी जेणेकरून शालेय शैक्षणिक खर्च उचलू न शकणाऱ्या पालकांच्या विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे हा हेतू या उपक्रमामागील आहे.प्रत्येक पालकाला वाटते आपल्या पाल्यास चांगले शिक्षण मिळावे तसेच दिवसेंदिवस शिक्षणात मोठे बदल होत चालले आहे.कोविड काळात ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरू झाली आहे यासाठी शिक्षणावरती काम करणे गरजेचे आहे. शिक्षक समाजाला दिशा देत असतात शिक्षणातून सार्वजनिक संस्कार घडण्यास मदत होत असते.शहरांमध्ये विकास कामांबरोबरच शिक्षण, कला,क्रीडा व संस्कारित शहर आपल्याला निर्माण करायचे आहे यासाठी शिक्षणाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

नगर शहरातील 145 शाळांना आ.संग्राम जगताप यांच्या माध्यमातून ई लर्निंग सॉफ्टवेअर व एलइडी स्मार्ट टीव्हीचे वाटप करण्याचा लोकार्पण सोहळा बागडपट्टी येथे हिंदसेवा मंडळामध्ये संपन्न झाला यावेळी मनपा प्रशासन अधिकारी सुभाष पवार,कांता तुंगार, प्रा.माणिकराव विधाते,सुमतीलाल कोठारी,रघुनाथ ठोंबरे, विठ्ठल उरमुडे,अन्सार शेख, शेखर ऊंडे,सुभाष येवले,विठ्ठल तिवारी,सुरेश शेवाळे,शिवाजी लंके,अमोल शिंदे,बाबासाहेब बोडखे, संदीप भोर,विजय कदम,मनीष बनकर, प्रशांत नन्नवरे,अनिता सिद्धम,विजय काटकर तसेच महाराष्ट्र राज्यमान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ अहमदनगरचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना रघुनाथ ठोंबरे म्हणाले की,आ.संग्राम जगताप यांचे शिक्षणाबद्दल असलेली दूरदृष्टी आज सर्वांसमोर आली आहे.कुठल्याही शाळेतील शिक्षकांनी मागणी न करता गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या उन्नतीसाठी व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिक्षण घेता यावे या हेतूने शहरातील 145 शाळांना ई लर्निंग सॉफ्टवेअर व एलईडी स्मार्ट टीव्ही उपलब्ध करून दिले त्यांचे हे कार्य कौतुकास्पद व आदर्शमय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना सुभाष पवार म्हणाले की, नगर शहरातील शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा उंचवावा यासाठी आ.संग्राम जगताप यांनी घेतला पुढाकार भावी पिढीसाठी मार्गदर्शक आहे. मनपा शिक्षण मंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत, आ.संग्राम जगताप यांच्याकडे शैक्षणिक दृष्टिकोन आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल तिवारी यांनी केले तसेच मान्यवरांचे स्वागत शेखर ऊंडे यांनी केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!