आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी

आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा
आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी
नगर : शहराचे आ. संग्राम जगताप यांनी गेल्या १० वर्षांमध्ये जनतेच्या सुख दुःखात सहभागी होत शहराच्या विकासाला गती दिली, व जनतेचा विश्वास संपादन केला याचबरोबर थेट जनतेशी असलेला संपर्क व नावानिशी असलेली ओळख यामुळे ऋणानुबंध निर्माण झाला असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त नगर शहरासह जिल्हा राज्यभरातील मित्रपरिवार मोठ्या संख्येने भेटण्यासाठी येत असतात त्यामुळे त्यांच्या संपर्क कार्यालय परिसरामध्ये तोबा गर्दी पहावयास मिळाली, आ. संग्राम जगताप यांनी वाढदिवसानिमित्त जनतेला आवाहन करीत सांगितले की, वाढदिवस हा साजरा करीत असताना सामाजिक बांधिलकी जोपासावी व विविध सामाजिक उपक्रम साजरे करावे याचबरोबर माझा वाढदिवस जून महिन्यात येत असून या काळात शाळा सुरू होत असतात.
यासाठी भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी बुके न आणता शालेय साहित्य घेऊन यावे जेणेकरून शहरातील गरजूवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत होईल अशी आवाहन केल्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने वह्या पुस्तके पेन पेन्सिल घेऊन येत असतात याचबरोबर शहरांमध्ये आरोग्य शिबिरे गरजूवंत विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले, आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त व्यापारी डॉ. इंजिनिअर युवक, महिला, विद्यार्थी, सर्वपक्षीय नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी आले होते. यावेळी शहरात सुरू असलेल्या व झालेल्या विकास कामाची एलईडी स्क्रीनवर चित्रफित लावण्यात आली होती.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles