उड्डाण पुलाखालील चिखल माती मुळे दुचाकीस्वरांचे अपघात
अहमदनगर प्रतिनिधी : पावसामुळे शहरातील उड्डाण पुलाखाली निर्माण झालेल्या चिखल मातीमुळे या रस्त्यावरून प्रवास करताना दुचाकीस्वार घसरून पडत होते, यात अनेक नागरिकांना दुखापत झाली आहे उड्डाण पुलाखालील या चिखल मातीमुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही ही गंभीर समस्या लक्षात घेत हा प्रकार गांभीर्याने घेत आमदार संग्राम जगताप यांनी या परिसराची पाहणी करत हि समस्या तात्काळ मार्गी लावण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, संबंधित उड्डाणपुलाच्या कंत्राटदार कंपनीचे इंजिनिअर यांना सूचना दिल्या.
पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील माती उचलणे गरजेचे असते. प्रशासनाने पावसाळ्या पूर्वीच उपाययोजना करणे गरजेचे होते, त्यांच्या दुर्लक्षामुळेच उड्डाण पुलाखाली चिखल मातीमुळे दुचाकीस्वारांचे अपघात झाले आहेत, याला सर्वस्वी प्रशासन जबबदार आहे, आमदार संग्राम जगताप यांनी या कामाबाबत सूचना केल्यानंतर या भागाचे काम तातडीने हाती घेण्यात आले. तर हे काम सुरू झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतलाय.