इंदुरीकर महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची २० मे रोजी होणार सांगता
नगर : महाराष्ट्रातील थोर समाज प्रबोधनकार राष्ट्रीय धर्माचार्य निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे मलकापूर (ढोरजळगाव) ता.शेवगाव.येथे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे बंद पडलेला सप्ताह इंदुरीकर महाराजांनी चालू करून अनेक तरुण पिढी संस्कारीक घडण्यात मोठं योगदान लाभत आहे. दरवर्षी नवीन तरुण मंडळी पवित्र तुळशीच्या माळी गळ्यात धारण करून संस्कारांचा अमूल्य ठेवा, संपादन करून संप्रदायाचे संस्कार आपल्या जीवनात अंगीकारत आहेत .
या सप्ताहात अनेक मान्यवरांची हरिकीर्तनाने होत आहेत. त्यात ह भ प अभंग महाराज सोमवंशी, ह भ प उद्धव महाराज सबलस, ह भ प दीपक महाराज देशमुख, ह भ प ऋषिकेश महाराज खोसे, ह भ प महिला भूषण शालिनीताई इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन सेवा संपन्न झाली तसेच शिव चरित्रकार गुरुदेव महाराज चव्हाण, भागवताचार्य महेश महाराज मडके, या सर्व महाराज मंडळीच्या कीर्तनाबरोबर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट अंकुश महाराज कोठुळे सर , ऋषिकेश महाराज फटांगरे, माऊली महाराज बहिर, देवानंद महाराज चव्हाण यांची भजन संध्या रविवार दिनांक १९/५/२०२४ रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत संपन्न होणार आहे.
या सप्ताहाची सांगता सोमवार दिनांक २०/५/२०२४ सकाळी १० ते १२ या वेळेत महाराष्ट्रातील थोर समाज प्रबोधनकार राष्ट्रीय धर्माचार्य निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे तदनंतर महाप्रसाद होईल. तरी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या अमृत श्रवण सुखाचा लाभ घ्यावा अशी विनंती मलकापूर ग्रामस्थ व ह भ प गुरभक्त संदीप महाराज खोसेयांच्या वतीने करण्यात आली आहे.