इनरव्हील क्लबच्या पदग्रहण सोहळ्यात वृत्तपत्र विक्रेत्यांना रेनकोटचे वाटप

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

श्रीलता आडेप यांनी स्विकारली अध्यक्षपदाची सूत्रे

अहमदनगर (प्रतिनिधी)- इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगर व्हिनसच्या पदग्रहण सोहळ्यात वृत्तपत्र विक्रेत्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. विविध सामाजिक कार्याचा जागर करुन पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला.
सामाजिक कार्यकर्त्या स्मिता ढगे, महिला उद्योजिका सुमन कुरेल व माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन सायली खानदेशकर यांच्या प्रमुख उस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला. क्लबच्या माजी अध्यक्षा अर्पिता शिंगवी यांनी श्रीलता आडेप यांना अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान केली. तर मेघा बकरे यांनी सचिव पदाची सूत्रे स्वीकारली.

प्रारंभी इनरव्हीलची प्रार्थना घेऊन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. जयश्री गायकवाड यांनी भरतनाट्यम नृत्याने गणेश वंदना सादर केली. क्लबच्या मावळत्या अध्यक्ष अर्पिता शिंगवी यांनी मागील वर्षी घेतलेले कॅन्सर जनजागृती उपक्रम, शाळेला सौर ऊर्जा प्रकल्प भेट, कॅन्सर तपासणी शिबिरांसह आरोग्य, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उपक्रमाच्या आढावा घेतला.

भर पावसात वेळेत सर्वांना घरपोच वृत्तपत्र पोहोचविणारे वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करुन त्यांना रेनकोटची भेट देण्यात आली. वृत्तपत्र विक्रेते शहर संघटनेचे अध्यक्ष गणेश गांधी यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांची गरज ओळखून दिलेली भेट ही कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट केले.

नूतन अध्यक्षा श्रीलता आडेप म्हणाल्या की, समाजाची गरज ओळखून इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगर व्हिनस योगदान देत आहे. विविध क्षेत्रातील महिलांना एकत्रित करून ही सामाजिक चळवळ सुरू आहे. सामाजिक कार्यात महिला योगदान देवून शेवटच्या घटकांपर्यंत मदत पोहचविण्याचे कार्य करत आहे. इनरव्हील क्लबचे शंभरावे वर्ष सुरू असून, नवीन वर्षात शंभर सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. तसेच यावेळी उपस्थित हर्षल आडेप व आडेप परिवाराने इनरव्हील क्लबच्या सामाजिक कार्यात सहयोग देण्याचे स्पष्ट केले.

क्लबच्या इतर पदाधिकाऱ्यांना विविध पदाची सूत्रे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तर नवीन सदस्य झालेल्या महिलांचा देखील यावेळी क्लबची पीन देऊन स्वागत करण्यात आले. क्लबच्या विविध सामाजिक उपक्रमांना सहकार्य करणारे ईश्‍वर बोरा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या पदग्रहण सोहळ्यासाठी क्लबचे महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाली बाकलीवाल यांनी केले. आभार भाविका चंदे यांनी मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!