कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
कर्जत तालुक्यातील तोरकड वाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील ज्ञान मंदिराची ही अवस्था होती.परंतु या सर्व विद्यार्थ्यांना अखेर भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य सुनिता अशोक खेडकर यांच्यामुळे मिळाला दिलासा..
त्यांनी या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या जिल्हा परिषद निधी मधून एक वर्ग खोली मंजूर केली आणि त्याचे भूमिपूजन आज सर्व ग्रामस्थ,विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये केले.
यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर, कर्जत तालुका दूध संघाचे चेअरमन शंकर देशमुख, दादासाहेब सोनमाळी, सुनील काळे,भाजपचे तालुका उपाध्यक्ष पांडुरंग भंडारे सरपंच रूपाली दीपक धुमाळ, उपसरपंच सुखदेव पितळे, दत्तात्रय धुमाळ ,रोहिदास तोडकर, गणेश तोडकर, विशाल मोरे, नाना काळे, सुरेश धुमाळ, ईश्वर तोडकर ,कल्याण भोंडवे, ग्रामसेविका श्रीमती तापकीर, शाळेचे वर्गशिक्षक व अनेक मान्यवर उपस्थित होते.
कर्जत तालुक्यातील तोडकर वाडी या ठिकाणी इयत्ता पहिली ते चौथी अशी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे.मात्र या शाळेतील सर्व विद्यार्थी बसण्यासाठी वर्ग नसल्यामुळे एकाच खोलीमध्ये या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील दोन शिक्षक ज्ञानार्जनाची धडे देत होते. या शाळेमध्ये दोन वर्ग खोल्या आहेत,त्यापैकी एक वर्ग खोली ही धोकादायक इमारत झाल्यामुळे तिचा वापर बंद करण्यात आला होता. यामुळे एका वर्गखोली मध्ये जिल्हा परिषदेच्या या ज्ञानमंदिरात विद्यार्थी अनेक वर्षांपासून शिक्षण घेत होते. वारंवार मागणी करून देखील वर्गखोल्या मिळत नव्हत्या.
हे सर्व पाहून भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य सुनिता अशोक खेडकर यांनी त्यांना दोन वर्गखोल्या साठी अनुदान मिळाली असता एक वर्ग खोली याठिकाणी ८ लाख ७५ हजार किमतीचे बांधून देण्यासाठी निधी दिला.
आपल्याला वर्गखोली मिळणार यामुळे गावातील विद्यार्थी देखील खूप आनंदी झाले होते.सध्या कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे.यामुळे इमारतीचा प्रश्न भेडसावू आला नाही.परंतु शाळा सुरू झाल्यानंतर मात्र शिक्षकांसमोर या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र शिकवण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत होती.बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना बाहेर पडवी मध्ये किंवा शेजारील अंगणवाडीच्या इमारतीचा आधार घ्यावा लागत होता.
या भूमिपूजन प्रसंगी बोलताना अशोक खेडकर म्हणाले की जिल्हा परिषद सदस्य माझी पत्नी असून आम्ही सातत्याने विरोधात असल्यामुळे निधीची कमतरता भासत होती.मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये या गावातील विद्यार्थ्यांसाठी वर्गखोली देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानुसार दोन वर्ग खोल्या मिळाल्या.त्यापैकी एक खोली या शाळेला बांधून देणार आहोत.त्यासाठी निधी देखील वर्ग केला आहे.वास्तविक पाहता जिल्हा परिषदेने आरोग्य आणि शिक्षण या दोन विभागांवर निधी देण्यास सातत्याने अन्याय केला आहे. आता ज्ञानाचे धडे देणारी ही मंदिरे ही अद्यावत चांगली आहे आणि विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी असावेत असा माझा सातत्याने प्रयत्न राहिला आहे.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण गटांमध्ये पिण्यासाठी शुद्ध पाणी,नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला.याशिवाय प्राथमिक गरजा पुरवण्यासाठी प्रत्येक गावांमध्ये जिल्हा परिषद मध्ये संघर्ष करून हा निधी देखील दिला.माजी मंत्री राम शिंदे व खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या सहकार्य मधून तोरकड वाडी येथे येण्यासाठी चांगला रस्ता व शेतकऱ्यांसाठी बंधारा तयार करून दिला आहे असे खेडकर यांनी सांगितले.
यावेळी बोलताना दूध संघाचे चेअरमन शंकरराव देशमुख म्हणाले की कोरेगाव जिल्हा परिषद गटांमधील हे सर्वात शेवटचे गाव असे असताना देखील जिल्हा परिषद सदस्य सुनीता अशोक खेडकर यांनी गावांमध्ये सातत्याने संपर्क ठेवून येथील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.
दादासाहेब सोनमाळी बोलताना म्हणाले की लोकप्रतिनिधीचे नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची मानसिकता असावी लागते.मग ते प्रश्न सुटतात आणि याचे उत्तम उदाहरण सुनिता अशोक खेडकर या आहेत.या गावातील अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न त्यांनी सोडवला. तसेच त्यांच्या जिल्हा परिषद गटांमधील जिल्ह्यात सर्वात जास्त विकास कामे त्यांनी केली आहेत.नागरिकांनी देखील आगामी काळामध्ये या सर्व बाबी लक्षात ठेवाव्यात असे आवाहन सोनमाळी यांनी यावेळी केले.
यावेळी सुनील काळे यांचेही भाषण झाले.मुख्याध्यापक दत्तात्रय गदादे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तर सरपंच रूपाली धुमाळ यांनी आभार मानले.