इरसाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना मदतीचा हात…

0
70

एमबीएच्या विद्यार्थ्यांनी जपली बंधुत्वाची भावना : डॉ एम बी मेहता

 

अहमदनगर प्रतिनिधी – भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. हि प्रतिज्ञा शाळेत असताना घेतली जाते पण इरसाळवाडी दुर्घटना घडल्यानंतर व तिथली परिस्थिती पाहिल्यानंतर आयएमएस मध्ये एमबीए चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या बांधवाना मदत करताना पाहून शाळेतील प्रतिज्ञेची आठवण आल्याचे गौरवोद्गार संस्थेचे संचालक डॉ एम बी मेहता यांनी केले.

आय एम एस संस्थेतील विद्यार्थाच्या वतीने इरसाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना मदतमदत पाठवण्यात आली.यावेळी संस्थेचे उपसंचालक डॉ विक्रम बार्नबस, डॉ.उदय नगरकर, प्रा विजय शिंदे व विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या वतीने इरसाळवाडी बाधितांना बिस्कीट, दुध पावडर, मँगी ची पाकिटे अशा वस्तू पाठवण्यात आल्या. रायगड येथील युवा अस्मिता या संस्थेच्या वतीने मदतीचे आवाहन करण्यात आले होते त्याला प्रतिसाद देताना विद्यार्थ्यांनी आपल्या रोजच्या बचतीतून हि मदत केली.

हि मदत विद्यार्थ्यांनी पुणे येथील कार्यालयात जमा केली. तेथून ती रायगड येथे पोहोच केली जाणार आहे.मदत किती आहे त्या पेक्षा ती करण्याची भावना माणसातील संवेदनशीलता जागृत असल्याचे निदर्शक असल्याचे उपसंचालक डॉ विक्रम बार्नबस यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी कृष्णा जाधव, रेणुका कर्डिले, वैष्णवी घटमल, प्रशांत पाखरे, करण नामदे, सौरभ काकडे, निकिता कराळे, अंकुर दानवे, सुशील तडके, पृथ्वीराज अडसुरे, गौरव पवार, गणेश अकोलकर, कृष्ण शेंडे, ज्ञानेश आव्हाड यांनी विशेष प्रयत्न केले.

शहरातील नागरिकांना जर मदत पाठवायची असेल तर त्यांनी युवा अस्मिता फौंडेशन चे कुणाल चव्हाण यांच्याशी ७०८३४२४९५५ किंवा संस्थेत ९५५२०४४५०९ या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here