युवक-युवतींच्या उद्योग व्यवसायासाठी प्रशिक्षणाचे आयोजन
ई टेंडरिंग, जेम पोर्टल प्रशिक्षण, फोटोग्राफी व आयात-निर्यातचे दिले जाणार प्रशिक्षण
अहमदनगर (प्रतिनिधी)- बेरोजगार युवक-युवतींना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी आणि नव उद्योजकांना व्यावसायिक उद्योजकता प्रशिक्षणाचे धडे देण्यासाठी शार्प बिझनेस कन्सल्टन्सी ॲण्ड एम एस एम ई ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एमआयडीसीच्या आयटी पार्क जवळील इन्स्टिट्यूट मध्ये ई टेंडरिंग, जेम पोर्टल प्रशिक्षण, फोटोग्राफी व आयात-निर्यात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले असून, या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेण्याचे आवाहन इन्स्टिट्यूटचे संचालक रविराज भालेराव यांनी केले आहे.
खादी और ग्रामोद्योग आयोग (केव्हीआयसी) भारत सरकार, डॉ. बी. आर. आंबेडकर रूरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट (नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 15 मे पासून या प्रशिक्षण वर्गाला प्रारंभ होणार आहे.
ई टेंडरिंग व जेम पोर्टल प्रशिक्षणात ई टेंडर भरणे, बिओक्यू प्रोसेस, ई टेंडर डाऊनलोड करणे, टेंडर वेबसाईटवर नोंदणी, आवश्यक सॉफ्टवेअर, डिजीटल स्वाक्षरी, एल1 टेंडर प्रक्रिया, डिजीटल फोटेग्रॉफी प्रशिक्षणात विविध प्रकारची फोटोग्रॉफी, कॅमेरा सेटिंग, कॅमेरा चालविण्याची मूळ संरचना, फोटोग्रॉफीचे विविध बारकावे तसेच आयात निर्यात प्रशिक्षणात फायनान्स, विविध देशाचे निकष, एक्सपोर्टचे प्रकार, शिपिंग डॉक्युमेंट, शासकीय योजना, उद्योग परवाने, सबसिडी आदींचे प्रशिक्षण अनुभवी तज्ञ व्यक्तींकडून दिले जाणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना शासकीय प्रमाणपत्र मिळणार आहे. या प्रशिक्षण वर्गात 18 वर्षावरील सर्व जाती-जमातीमधील युवक-युवतींना सहभागी होता येणार आहे. प्रशिक्षणार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, तो कमीत कमी पाचवी ते कोणत्याही शाखेचा पदवीधर असण्याचे म्हंटले आहे. अधिक माहितीसाठी 9960599985 व 9373473929 यानंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.