अहमदनगर प्रतिनिधी – आपल्या या कामगिरीबद्दल पोलिस दलात वेगळा ठसा उमटवणारे धुळ्याचे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांची नागपूर येथे उपायुक्तपदी बदली झाल्याबद्दल त्यांचा स्नेहबंध फाऊंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला.
पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी अहमदनगर, अमरावती, नागपूर आणि धुळे येथे आपल्या कार्यकाळात धडाकेबाज कारवाई करुन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. धुळे येथेही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. आता त्यांची नागपूर येथे उपायुक्त म्हणून बदली झाली.
त्यांच्या धुळे येथील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी अमित खामकर, सुरेश पंडित, मंजिरी पंडित आदी उपस्थित होते.