उत्कृष्ट यष्टीरक्षण व फलंदाजीच्या जोरावर अहमदनगरची खेळाडू अंबिका वाटाडे बीसीसीआयच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी निवड

0
88

महाराष्ट्राचे प्रतिनिधत्व करताना उमटवला ठसा

अहमदनगर प्रतिनिधी – सुरत येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट यष्टीरक्षण व फलंदाजी करीत आपला ठसा उमटवणारी अहमदनगरची उद्योन्मुख क्रिकेटपटू अंबिका वाटाडे हिची बीसीसीआयतर्फे होणार्‍या १९ वर्षाखालील महिलांच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी निवड झाली असल्याची माहिती जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव गणेश गोंडाळ यांनी दिली.

बीसीसीआयतर्फे आयोजित चॅलेंजर ट्रॉफी जयपूर येथे 25 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान होत आहे. अ, ब, क व ड या चार संघात होणार्‍या या स्पर्धेतून अंडर 19 विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताचा महिला संघ निवडला जाणार आहे.उल्लेखनीय बाब म्हणजे प्रथमच मोठ्या स्तरावर खेळताना तिने हे यश मिळवले आहे.

वाटाडे ही उत्कृष्ट यष्टीरक्षक असून मागील चार वर्षापासून महाराष्ट्राच्या संघात खेळत आहे.आक्रमक फलंदाज म्हणून तिची ओळख आहे.ती बाभळगाव येथील असून, पाथर्डी येथील एस.व्ही.नेट मध्ये शशिकांत निर्‍हाळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.

अंबिका चॅलेंजर ट्रॉफीत अ संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. या निवडीबद्दल जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आमदार अरुणकाका जगताप, आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सुमतीलाल कोठीरी यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here