उत्तर प्रदेश येथील मुस्लिम समाजाचे धर्मगुरु मौलाना सिद्दीकी यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नसताना राजकीय हेतूने कारवाई केल्याचा आरोप.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

या शडयंत्रा मध्ये राजकीय नेते व अधिकारी सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी.

अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख

उत्तर प्रदेश येथील मुस्लिम समाजाचे धर्मगुरु मौलाना कलीम सिद्दिकी यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नसताना राजकीय हेतूने अटक करून कारवाई केल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालय येथे समस्त मुस्लिम भारतीय तर्फे निषेध नोंदवून निवेदन देण्यात आले.

यावेळी जमियात उलमा ए हिंदचे शहराध्यक्ष मौलाना शफीक कासमि समवेत वाहदते इस्लामीचे अल्ताफ शेख, नसीर शेख, वसीम सय्यद, मुफती अल्ताफ, नईम सय्यद, नदीम शेख, इस्माईल शेख, मुस्तफा खान, निसार बागवान, खलील सय्यद, आय.बी.शहा, अमीर सय्यद आदीसह मुस्लीम बांधव उपस्थित होते.

उत्तर प्रदेश येथे लवकरच निवडणूक चालू होणार असल्यामुळे नेहमीसारखे सरकारला जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने कुणीतरी पाहिजे असते त्या हेतूने एटीएसने भारताचे नागरिक असलेले मौलाना कलीम सिद्दिकी यांना हटकून मौलाना सिद्दिकी यांच्यावर धर्मपरिवर्तन चे आरोप लावून त्यांना अटक करण्यात आली.

भारताचे संविधानाने समस्त भारतीयांना आपले जीवन आपल्या धर्माच्या हिशोबाने जगण्याचे व त्यांचा प्रचार व प्रसार करण्याचा अधिकार दिलेला आहे कोणीही भारतीय नागरिक स्वतःहून धर्म बदलत असेल किंवा मौलाना यांच्या जवळ येऊन इस्लाम धर्मात प्रवेश करत असेल तर तो त्याच संविधानिक अधिकार आहे.

परंतु उत्तर प्रदेशची सरकारने एटीएस ला हाताशी धरून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आहे यासाठी नेहमी प्रमाणे मुस्लिम समाजातील व्यक्तींची गरज असते त्यामुळे मौलाना कलीम सिद्दिकी यांना अटक केली आहे व सदर घटनेचा समस्त भारतीय तर्फे निषेध व्यक्त केला जात आहे.

त्याचबरोबर या शडयंत्रा मध्ये जे नेते अधिकारी सहभागी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!