दोन मॅट व एक मातीचा आखाडा सज्ज
जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यातील तीनशे पेक्षा जास्त मल्ल होणार सहभागी
अहमदनगर प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा तालीम संघ, संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे व श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने पाथर्डी तालुक्यातील एस.एम.निर्हाळी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात शनिवार दि.२० व रविवार दि.२१ नोव्हेंबर रोजी पार पडणार्या उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

स्पर्धेच्या मैदानाची व आखाड्याची पहाणी जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै.वैभव लांडगे,शहराध्यक्ष पै. नामदेव लंगोटे,पाथर्डी तालुका तालीम संघाचे सचिव पै राजेंद्र शिरसाठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, मार्केट कमिटीचे संचालक बाळासाहेब घुले, महादेव आव्हाड आदी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यात पहिल्यांदाच ग्रामीण भागात उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत असून, केदारेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन प्रतापकाका ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीसाठी जंगी नियोजन करण्यात आले आहे. शनिवार व रविवारी दिवस-रात्र कुस्त्यांचा थरार प्रेक्षकांना अनुभवयास मिळणार आहे.
या स्पर्धेसाठी जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यातील तीनशे पेक्षा जास्त मल्ल येण्याची अपेक्षा असून,त्या दृष्टीने मल्ल,पंच व पाहुण्यांसाठी राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.विद्यालयाच्या भव्य प्रांगणात दोन मॅट व एक मातीचा आखाडा तयार करण्यात आला असून,पाच हजार प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जिल्हा तालीम संघाचे खजिनदार पै.नाना डोंगरे,अॅड.धनंजय जाधव,पै.विलास चव्हाण,पै.मोहन हिरणवाले,पै.सुनिल भिंगारे, कुस्ती मल्लविद्येचे पै.गणेश मानगुडे,वरिष्ठ उपाध्यक्ष पै.दत्तात्रय आडसुरे,पै.युवराज पठारे,पै.विक्रम बारवकर,पै.संदीप बारगुजे,पै.प्रताप पाटील चिंधे,कुस्ती मल्ल विद्येचे जिल्हाध्यक्ष मिलिंद जपे,नगर तालुका तालिम सेवा संघाचे सचिव बाळू भापकर,पंच गणेश जाधव,पै.बबलू धुमाल,पै.प्रवीण घुले,पै.अनिल गुंजाळ परिश्रम घेत आहे.