भाईसथ्था रात्र प्रशाले तर्फे पै.सुदर्शन कोतकर यांचा गौरव
अहमदनगर प्रतिनिधी – अमोल भांबरकर
भाई सथ्था नाईट हायस्कूलचा विद्यार्थी पैलवान सुदर्शन कोतकर याने “उत्तर महाराष्ट्र केसरी” बहुमान मिळवून हिंदसेवा मंडळाच्या नाव लौकिकात भर घातली आहे.
पैलवान सुदर्शन कोतकर यांनी जिद्दीने,मेहनतीने व परिश्रमाने कुस्ती स्पर्धेत मोठे यश संपादन केले आहे.याचा सर्वांना अभिमान आहे. हिंदसेवा मंडळासाठी ही बाब भूषणावह आहे.
भाई सथ्था नाईट हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच कला,क्रीडा व कौशल्य क्षेत्रात वाव मिळण्यासाठी विविध उपक्रम हिंदसेवा मंडळा तर्फे राबविण्यात येतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौशल्य विकास योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना जन शिक्षण संस्थेमार्फत मोफत फोटोग्राफी,शिलाईकाम,ब्युटी पार्लर,इलेक्ट्रिशियन कोर्सचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले आहेत.तसेच मासूम संस्थेतर्फे तीन विद्यार्थ्यांना डी एम एल टी चे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे.
“उत्तर महाराष्ट्र केसरी” पैलवान सुदर्शन कोतकर यांची कामगिरी कौतुकास्पद आहे.असे प्रतिपादन हिंदसेवा मंडळाचे उपकार्याध्यक्ष तथा भाई सथ्था नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ.पारस कोठारी यांनी केले.
हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था नाईट हायस्कूल मधील इ.१० वीत शिक्षण घेत असणारा विद्यार्थी सुदर्शन महादेव कोतकर याने कुस्ती स्पर्धेत मानाचा “उत्तर महाराष्ट्र केसरी” बहुमान मिळविल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सन्मानचिन्ह प्रदान करुन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, कार्याध्यक्ष अजित बोरा,मानद सचिव संजय जोशी,माजी कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, उपाध्यक्ष रणजीत श्रीगोड, सीताराम सारडा विद्यालयचे चेअरमन प्रा.मकरंद खेर, हिंदसेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेचे चेअरमन मधुसूदन सारडा,पेमराज सारडा जुनिअर कॉलेजचे चेअरमन अॕड.अनंत फडणीस,युवा सेना शहर प्रमुख हर्षवर्धन कोतकर,सहाय्यक सचिव बि.यु.कुलकर्णी,अधिक जोशी,कल्याण लकडे,प्राचार्य सुनील सुसरे,दादा चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर साबळे,मासूमचे अशोक चिंधे,जिल्हा तालीम संघाचे पै.नाना डोंगरे,बाळासाहेब भापकर, पै.काका शेळके,प्रा.संजय साठे आदी उपस्थित होते.
प्रा.मकरंद खेर म्हणाले की,मल्लविद्या हा एक बुद्धीचा खेळ आहे.शाळेतील विद्यार्थ्यांना सरस्वती देवी बरोबरच भगवान मारुतीराया यांचा वरदहस्त नेहमी असावा. मल्लविद्या म्हणजे शक्ती व बुद्धी यांचा मेळ आहे.
ब्रिजलाल सारडा म्हणाले की, महाभारतापासून आपल्याकडे अनेक मल्लांची उदाहरणे आहेत.पै.कोतकर यांनी कुस्ती स्पर्धेत चांगला नावलौकिक मिळवला आहे.मी त्यांना सांगू इच्छितो की आपली शक्ती समाजकार्यासाठी वापरून एक प्रकारे देशसेवा करून देशाचे नाव उज्वल करावे.
नाना डोंगरे म्हणाले की,भाई सथ्था रात्रशाळेचे शिक्षणक्षेत्रात उज्ज्वल असे नाव आहे.पै.सुदर्शन कोतकर यांच्या कामगिरीने नगर तालुक्याचे नावलौकिकात भर पडली आहे.
प्रा.शिरीष मोडक म्हणाले की, पैलवान सुदर्शन कोतकर यांनी मिळवलेल्या यशामध्ये त्याचा जेवढा वाटा आहे.तेवढाच बाहेरून मिळालेल्या पाठिंब्याचा देखील वाटा आहे.भाई सथ्था रात्र शाळेतील विद्यार्थांना सर्व शिक्षक प्राचार्य व चेअरमन यांचे योग्य मार्गदर्शन वेळोवेळी मिळत असते.पै.सुदर्शन कोतकर यांनी यापुढे परिश्रम करून कुस्ती क्षेञातील हिंदकेसरी बहुमान मिळवावा.अशा शुभेच्छा दिल्या.
तसेच पै.कोतकर यांच्या पुढील शिक्षणासाठी हिंदसेवा मंडळातर्फे महाविद्यालयीन शिक्षणासाठी मोफत व्यवस्था करण्यात येईल.
सत्काराला उत्तर देताना पै. सुदर्शन कोतकर म्हणाले की,ही तर माझी सुरुवात आहे.सर्वांचा आशीर्वाद माझ्या सोबत राहू द्या.मी कुस्ती क्षेत्रात जूनियर चॅम्पियनशिप मिळविण्यासाठी इच्छुक आहे.असे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.देविदास खामकर, प्रा.महादेव राऊत,गजेंद्र गाडगीळ,कैलास करांडे,अशोक शिंदे,शिवप्रसाद शिंदे,संदेश पिपाडा,मंगेश भुते, प्रा.अमोल कदम,प्रशांत शिंदे,बाळू गोर्डे,सौ.दुराफे,सौ.साताळकर, अनिरुद्ध देशमुख,अनिरुध्द कुलकर्णी,संदीप कुलकर्णी, अविनाश गवळी,मनोज कोंडेजकर,कैलास बालटे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
सर्व उपस्थितांचे स्वागत प्राचार्य सुनिल सुसरे यांनी केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शरद पवार यांनी केले तर आभार बाळू गोर्डे यांनी मानले.