उन्हापासून संरक्षण होण्यासाठी वृक्षरोपण आणि संवर्धन गरजेचे
बालाजी फाऊंडेशन आणि ‘एस सि एफ द वे ऑफ सक्सेस’ चा कौतुकास्पद उपक्रम
नगर : सध्या उन्हाचा तडका खूप वाढत चालला आहे. कित्येक ठिकाणी दुष्काळ सुद्धा पडलेला आहे, हे एक मानवावर आलेले मोठे संकट आहे, परंतु आपल्याला जर या संकटातून वाचायचा असेल तर वृक्ष संवर्धन करणे खूप गरजेचे आहे. उन्हापासून संरक्षण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावणे गरजेचे आहे.वृक्षांचे अनेक फायदे असून त्यासाठी सोशल मिडियाच्या फावल्या वेळेचा वापर करत आम्ही सर्व वृक्षप्रेमी मित्र एकत्रित आलो आणि वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यासाठी सुरुवात केली आहे यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. आम्हाला पर्यावरण संवर्धनासाठी काहीतरी नाविन्यपूर्ण करायचं यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन जुन्या झाडांबद्दल माहिती गोळा करून बालाजी फाऊंडेशन आणि एस सि एफ द वे ऑफ सक्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष संवर्धनाचे काम केले.
यामध्ये झाडांना आळी करून टँकरने पाणी देण्यात आले व त्याबरोबरच पक्षांना पाणी व धान्य ठेवण्यासाठी भांडी ही ठेवण्यात आली तसेच जुन्या झाडांची माहिती घेऊन हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करून येणाऱ्या काळामध्ये पाच लाखापेक्षा जास्त झाडे आम्ही दत्तक घेणार आहोत यामध्ये जुनी झाडं वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत आम्ही एक लाखापेक्षा जास्त झाडे सर्वे केलेले आहेत त्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या देशी, विदेशी झाडांची माहिती भेटलेली आहे आम्हाला समाजाला संदेश द्यायचा आहे की येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला जागतिक तापमान वाढ या गोष्टीपासून वाचायचे असेल तर वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करणे खूप गरजेचे आहे.
गेल्यावर्षी देडगाव बालाजी येथे फौंडेशनच्या माध्यमातून जी झाडं लावण्यात आली त्या ठिकाणी पाण्याची वानवा होती म्हणून , त्या ठिकाणी झाडांना पाणी देण्यासाठी बोअर घेण्यात आली व पाण्याची मोटर बसवण्यात आली, त्यामुळे आजूबाजूला या वर्षी अजून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे त्यासाठीचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात आलेला आहे. वृक्षरोपण आणि संवर्धन साठीची एक लोकचळवळ असून यात नागरिकांनी सहभागी होत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करत पर्यावरणाच्या संतुलनासाठी काम करावे असे आवाहन बालाजी फाऊंडेशन आणि एस सि एफ द वे ऑफ सक्सेस या संस्थेच्या वतीने करण्यात आले