अहमदनगर प्रतिनिधी- उपक्रमशील शिक्षिका अनिता काळे यांना सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला कोरोना काळात विविध उपक्रम राबवून पालकांना व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन शिक्षण प्रवाह सातत्य टिकवून ठेवले वेळोवेळी गृहभेटी देऊन नवनवीन उपक्रम राबविले.
जिल्हा परिषद येथील उपक्रमशील शिक्षिका अनिता काळे यांना राज्यस्तरीय महिला शिक्षक भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला कोल्हापूर येथील भगवती हॉलमध्ये राज्य सरपंच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष यादवराव पावसे व अध्यक्ष भाऊसाहेब मरगळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी राज्य सरपंच सेवा संघाच्या महिला अध्यक्षा प्रमिला एखडे, उपाध्यक्षा वर्षा गिरी, राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे, जयदीप वानखेडे, उद्योन्मुख अभिनेत्री भार्गवी पुराणिक, राजेंद्र पुराणिक आदी उपस्थित होते.
अनिता काळे हे सामाजिक क्षेत्रातील जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय संघटक पदी तसेच प्रयास ग्रुपच्या उपाध्यक्षपदी कार्यरत आहे महिलांच्या विविध प्रश्नांसाठी सतत कार्यरत असतात.
त्यामुळे सरपंच सेवा संघाचे राज्याध्यक्ष मरगळे म्हणाले की अनिता काळे यांचे विविध क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे.राष्ट्राची पायाभरणी ही खऱ्या अर्थाने शाळेतून विद्यार्थ्यांना होत असते.त्यामुळे उपक्रमशील व गुणवंत शिक्षिका अनिता काळे यांना त्यांच्या कार्याबद्दल गौरविण्यात आले.
तसेच राज्य सरपंच सेवा संघातर्फे राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक, कला, शिक्षण, राजकीय, उद्योग, वैद्यकीय, क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या पुरस्काराबद्दल शिक्षण अधिकारी
गटशिक्षणाधिकारी कापरे साहेब, शिक्षण अधिकारी प्राथमिक शिवाजी शिंदे व वडगांव गुप्ता केंद्राचे केंद्र प्रमुख दिलीप दहिफळे याच्या सह जिल्हाभर पुरस्कारा बदल अनिता काळे यांचे अभिनंदन होत आहे.