विशेष प्रतिनिधी – सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन आणि Kya News च्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर, शिर्डी येथे पत्रकार संमेलन सोहळा हा मोठ्या दिमाखात साजरा झाला.या सोहळ्याची शोभा वाढविण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री विखे पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. पण काही कारणास्तव मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच महसूल मंत्र्यांना या प्रसंगी उपस्थित राहता आले नाही.
दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले तसेच भाजपचे सहप्रवक्ता अजित चव्हाण यांनी सदर कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली. या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर तसेच Kya News चे संस्थापक देवेश गुप्ता व संचालक गौरव शेट्ये यांनी केले.
महाराष्ट्राच्या विविध भागांतून शेकडोंच्या संख्येने पत्रकारांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता व पत्रकारांच्या विविध अडचणींविषयी या वेळी चर्चा करण्यात आली. दरम्यान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते Kya News या राष्ट्रीय ऍपचे अनावरण सुद्धा करण्यात आले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रांकडून सदर कार्यक्रमाविषयी माहिती घेतली आणि सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे जनसंपर्क अधिकारी सिद्धांत कांबळे यांच्याकडे सदर कार्यक्रमाचे शुभेच्छा पत्र सुपूर्द केले.
शुभेच्छा पत्रामध्ये त्यांनी लिहिले- Advertisement -
“सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन तसेच Kya News च्या माध्यमातून श्री. साईबाबांच्या शिर्डीत पत्रकार संमलेन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे समजून आनंद झाला. या संमेलन सोहळ्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा! महाराष्ट्राला पत्रकारितेची समृद्ध परंपरा लाभली आहे. दर्पण या वृत्तपत्राद्वारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर बहरलेली जाज्वल्य पत्रकारिता आपण सर्वांनी अनुभवली आहेच. हि परंपरा यापुढेही पाहायला मिळेल, असा विश्वास आहे. या संमेलनात सहभागी होत असलेल्या सर्व पत्रकार बंधूंचे हार्दिक अभिनंदन. तसेच सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन व Kya News टीम ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !”
सदर कार्यक्रम Kya News चे नैना पासी, आकांशा घोले, किरण पांचाळ, लक्ष्मी कमवाल व साक्षी किर यांनी अहोरात्र मेहनत घेऊन यशस्वीरीत्या पार पाडला.