उपोषण न करण्यासाठी पिडीत कुटुंबीय व सामाजिक कार्यकर्त्यास धमक्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्‍यावर गुन्हा दाखल होण्यासाठी केले जाणार होते उपोषण

अहमदनगर(प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणार्‍या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी उपोषणाचा इशारा देणारे अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पिडीत कुटुंबीयांना धमकावल्याप्रकरणी आरोपीच्या भाऊ विरोधात पारनेर पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पारनेर तालुक्यातील एका गावात 4 एप्रिल रोजी एका अल्पवयीन मुलीला शाळेतून फूस लावून पळविण्यात आले. याबाबत पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुलीच्या कुटुंबीयांना त्या गावातील एका व्यक्तीविरोधात संशय असून, त्या व्यक्तीविरोधात व मुलीला पळवून नेण्यास सहाय्य करणार्या त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती व पिडीत कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता.

मात्र आरोपीच्या भावाने पिडीत कुटुंबीय व सामाजिक कार्यकर्ते रोडे यांना फोन करुन उपोषण थांबवावे व भावाचा नाव न घेण्यासाठी धमकावले. या प्रकरणी पिडीत मुलीच्या वडिलांनी पारनेर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यावरुन संबंधितावर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!