जन्मलेल्या बाळापासून ते वृध्दांना आधार कार्ड गरजेचे – अतुल फलके
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामस्थांसाठी एकता फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने आधार नोंदणी व दुरुस्ती कॅम्प घेण्यात आले. या शिबीरास ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थी व युवक-युवतींचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला.
एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके, ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, डॉ. विजय जाधव, अरुण अंधारे, अशोक जाधव, मुख्याध्यापक किरण सांगळे, दिपक फलके, तुकाराम कापसे, रामदास पवार, किरण जाधव, सागर फलके, विकास जाधव, सुधीर खळदकर, हुसेन शेख, शब्बीर शेख, अजित फलके, सोमनाथ फलके, राहुल फलके आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालेल्या या शिबीरात नवीन आधार नोंदणी करण्यात आली. तसेच आधार कार्ड मधील इतर दुरुस्ती व मोबाईल क्रमांक व पत्ता अद्यावत करुन देण्यात आला. आधार कार्ड ही नागरिकांसाठी अत्यावश्यक बाब बनली आहे.
जन्मलेल्या बाळापासून ते वृध्दांना आधार कार्ड अनिवार्य व गरजेचे बनले आहे. अनेक सरकारी कामे, योजना व इतर कामांसाठी आधार कार्डची गरज भासते.गावासह शहरात ठराविक आधार नोंदणी केंद्र असल्याने नागरिकांची त्या ठिकाणी गर्दी होते.
नागरिकांची सोय होण्यासाठी या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरास ग्रामस्थांना चांगला प्रतिसाद लाभल्याचे अतुल फलके यांनी सांगितले.