एक सामान्य नागरिकाची सर्व लोकप्रतिनिधींना कळकळीची विनंती…

0
199

आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि महाविकास आघाडी मधील सर्व आमदार मंत्री महोदय,आदरणीय विरोधी पक्ष प्रमुख फडणवीस साहेब आणि कायमच टीका करणारे सर्व विरोधक,महाराष्ट्र राज्यातील सर्व खासदार साहेब सर्व केंद्रीय मंत्री जे महाराष्ट्रातील जनतेने निवडून दिले.

आपल्या सर्वांची मालमत्ता गरीब,शेतकरी,मजुर यांच्याहून करोडपतीने जास्त आहे.आपण मतासाठी आमच्या दारी आला.मात्र मागील दोन वर्षांपासून या राज्यावर अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या,कोरोनाने कहर केला.आपण मात्र पंच तारांकित रुग्णालयात उपचार घेतले आणि मतदार राजा मात्र बिना बेड आणि ऑक्सिजन वाचून गेला.

तरी परिस्थिती बदलली नाही तोकते वादळ,गुलाब वादळं आणि अनेक कुटुंब उद्धवस्त झाली.पण ज्यांना निवडून दिले ते फक्त खुर्ची आणि सतेसाठी भांडत आहेत.सर्वानि आज एकत्र येऊन मदत करावी,हे होत तर नाही उलट आमच्या गरीब जनतेचे पैसे झेड सिक्युरिटी वर खर्च होत आहेत.वाचाळ वक्तव्य जर नेते करत असतील तर या सारखे वाईट महाराष्ट्रात काहीच नाही.अगदी बोटावर मोजण्या इतके लोकप्रतिनिधी लोकांसाठी झटत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.

मुख्यमंत्री साहेब,आरोग्यमंत्री साहेब आपण कोरोना परस्थिती फार ऊत्तम हाताळली हे आम्ही अनुभवल.परंतु आपल्या वाटेत संकट येत आहेत.आपण खंबीर आहात. परंतु आज मी एक नागरिक म्हणून मला असे वाटते की वरील सर्व मान्यवर व्यक्तींनी स्वतःच्या मालमतेमधून फक्त २० कोटी रुपये मदतनिधी म्हणून जमा केला तर आता पर्यंत या नैसर्गिक आपत्ती मध्ये उद्धवस्त झालेला महाराष्ट्र पुन्हा उभा राहील.

आपल्या सर्वांकडे किती मालमत्ता आहे हे सर्व जनतेला माहीत आहे.आपण जर या संकट काळात मदत केली तर जनता तुम्हाला प्रचार न करता पुढील निवडणुकीत निवडून देईल.पण आपण जर राजकारण करून जनतेला मारण्यासाठी सोडून द्याल तर याचे उत्तर नक्कीच जनता विचारेल.

सर्व पदासाठी परीक्षा,यामध्ये गरीब मरतात. आपण मात्र आपल्या कुटुंबाचे भले करता.त्यामुळे ईडी सारखे चक्र चालू होते.त्यामुळे आमची विनंती आहे २० कोटी सर्वानी मदत निधीत सरकारकडे सुपूर्त करा आणि गरीब कोकण मध्ये वादळात उद्धवस्त शेतकरी तसेच आता मराठवाड्यातील शेतकरी वाचतील हो….

फार वाईट वाटते आहे.वाचवा हो वाचवा या महाराष्ट्राला वाचवा.ही आपणास विनंती करत आहे.आपण सध्या जनतेसाठी मायबाप आहेत.आज वेळ आहे.वाचवा आम्हाला फक्त दौरे नको,आम्हला मदत करा,आधार नको,आर्थिक मदती शिवाय जगणे अवघड झाले आहे. हा आमचा जनतेचा आक्रोश आहे.पाहू आपण किती आमची काळजी करता.दान मंदिरात नको जिवंत माणसाला करा ही आर्त हाक आहे आमची.शेतकरी अश्रू पाहू शकत नाही म्हणून लिहावे वाटले.

दौरा नको,जीव वाचवा,
वाचवा वाचवा वाचवा…

सुरेखा आंधळे
नागरिक महाराष्ट्र राज्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here