अमरापूर प्रतिनिधी- प्राथमिक विद्यामंदिर च्या वतीने कर्मयोगी आबासाहेब काकडे यांची ४३ वी पुण्यतिथी कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.भारत वीरकर हे होते तर प्रमुख पाहुणे श्री. बापूराव राशिनकर (सामाजिक कार्यकर्ते,)श्री.सुनील म्हस्के (सरपंच, वरुर )श्री. नवनाथ फाटके (केंद्र प्रमुख,शास्त्रीनगर ) शाळेचे निरीक्षक बळवंत शिंदे गुरुजी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.बापूराव राशिनकर यांनी कॉ.आबासाहेब काकडे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की आबासाहेब काकडे यांनी शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी मोठा लढा उभा केला.
मुळा धरणाचे पाणी लाडजळगाव पर्यंत जावे व कोपरे धरण व्हावे जायकवाडी धरणातून ताजनापुर द्वारे शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळावे यासाठी मोठे जनआंदोलन आबासाहेब यांनी उभे केले होते.
नवनाथ फाटके यांनी आपल्या भाषणात सांगितले कि ताजनापुर लिफ्ट योजनेसाठी तीन टीएमसी पाणी राखून ठेवण्यात आले.शेतीसाठी पाणी मिळावे तसेच गरिबांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी वस्तीगृह शाळा सुरू करून शैक्षणिक कार्य आबासाहेबांनी सुरू केले.गरिबाचे वकील म्हणून ते जिल्ह्यामध्ये त्यांची ओळख होती.”
४३ व्या पुण्यस्मरणा निमित्त वक्तृत्व स्पर्धेतील व रंगभरण स्पर्धेतील विदयार्थ्याना ट्रौफी व प्रमाणपत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम परवीन पटेल यांनी केले.यावेळी सर्व शिक्षक श्रीम सुवर्णा नरवडे,अर्चना सुडके, वनिता वाणी,मनिषा मरकड, सदिशा पोकळे,स्वाती वाबळे,नर्गिस पटेल,पालक, विध्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश वसावे व आभार प्रदर्शन कैलास धनवडे यांनी केले.