एम एम ए मॅट्रिक्स व इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन यांच्यावतीने जागतिक योग दिन उत्साहात साजरा
धकाधकीच्या जीवनामध्ये योगाचे महत्व – स्वप्निल पर्वते
नगर : धकाधकीच्या जीवनामध्ये मनुष्य आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे विविध आजारपणाला सामोरे जावे लागत आहे. कोरोना महामारीच्या संकट काळामध्ये योगाचे महत्त्व संपूर्ण जगाला समजले आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने योगा कडे वळाले आहे. योगाच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सदृढ निरोगी राहण्यास मदत होत असून आनंदीमय जीवन जगत आहेत. तसेच बौद्धिक व शारीरिक विकास होण्यास मदत होत असते. एम.एम.ए. मॅट्रिक्स जिम यांच्या वतीने युवकांमध्ये योगाची आणि व्यायामाची गोडी निर्माण ओवी यासाठी काम करत आहे. आजचा तरुण व्यसनाधीनतेकडे आकर्षित होता असून त्यांना त्यापासून दूर करत व्यायामाकडे वळविण्याचे काम केले जात असल्याचे प्रतिपादन स्वप्नील पर्वते यांनी केले.
एम.एम. ए. मॅट्रिक्स जिम इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन यांच्यावतीने जागतिक योग दिन उत्साहात साजरा यावेळी टीम 57 चे संचालक स्वप्निल पर्वते, प्रयास ग्रुपच्या संचालिका अलका मुंदडा, डॉ.यश पाटील श्रीनिवास नाब्रिया, प्रेरणा नाब्रिया,सुभाष जाधव भारत बागरेचा, डॉ. अमोल बागुल,योगेश मोहाडीकर, किरण बगळे, प्रशांत काळभोर, सचिन काळभोर, नेत्रा नाबरीया, दिनेश जाधव, ओंकार पाटकर, सचिन पर्वते, राज पर्वते, कालिदास पर्वते, योगिता पर्वते, गीता पर्वते, मनीषा पर्वते, एकता पर्वते आदि उपस्थित होते.
अलका मुंदडा म्हणाल्या की, टीम 57 चे सामाजिक कार्य कौतुकास्पद असून ते वर्षभर समाजाप्रती विविध सामाजिक उपक्रम राबवीत असतात. समाजामध्ये महिला वावरत असताना पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे. आपल्या कुटुंबाचा संभाळ करत व्यवसाय नोकरी करत असतात. यामध्ये मानसिक ताण तणाव निर्माण होतो. त्यामुळे महिलांना विविध आजारपणाला सामोरे जावे लागते महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी योगाचे धडे घ्यावेत व आपले आरोग्य सदृढ निरोगी ठेवावे योगाच्या माध्यमातून आनंदी जीवन जगता येत आहे असे त्या म्हणाल्या.