अहमदनगर प्रतिनिधी – गेल्या काही दिवसांपासून अनेक एस.टी.कर्मचार्यांनी विविध कारणांनी आत्महत्या केल्या आहेत.या आत्महत्येस शासन जबाबदार असून, हे आघाडी सरकार कर्मचार्यांची आर्थिक व मानसिक पिळवणुक करत आहे.त्यामुळे कर्मचार्यांना मोठ्या तणावाखाली काम करावे लागत आहे.
यासाठी शासनाचे धोरण कारणीभुत ठरत आहे.एस.टी.कर्मचार्यांना महिनो-महिने पगार वेळेवर होत नाही.तर कधी डिझेल अभावी एस.टी.बंद राहत आहेत.त्यात चालक-वाहकांना मारहाणीच्या घटना सातत्याने घडत आहे,अशा एकंदर परिस्थितीमुळे या कर्मचार्यांना काम करणे अवघड झाले आहे.या कर्मचार्यांच्या पाठिशी भाजपा असून, कर्मचार्यांचे प्रलंबित सर्व प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन तीव्र आंदोलन करु.
याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्रफडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून,या कर्मचार्यांच्या पाठीशी उभे राहून,त्याचे प्रश्न सोडविण्यास शासनाला भाग पाडू,असे सांगितले आहे,अशी ग्वाही भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी दिली.
शेवगांव तालुक्यातील एस.टी.चालक दिलीप काकडे यांनी आत्महत्या केली असून,नगरच्या तारकपुर डेपोमध्ये भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी येथील कर्मचार्यांचीभेट घेऊन तातडीने राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी फोनवरुन संवादसाधून भाजप कर्मचार्यांच्या पाठिशी उभे राहणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजपाचे तुषार पोटे,डॉ.ज्ञानेश्वर दराडे,शेषराव फुंदे,कर्मचारी संघटनेचे संजय देशपांडे, शितल भिंगारदिवे, सुरज भंडारी, जया वाघ, राम जाधव, एस.के.गाडेकर, तेजश्री पुंड, महेश म्हस्के, ज्ञानदेव जाधव, बी.आर.साळवे,पी.बी.सुरवसे, संजय काटकर, उमेश गलांडे, डी.के.धनगर,इरफान पठाण,मिरा पवार यासह एस.टी.कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी विविध विषयांवर उपस्थितांशी चर्चा करुन शासनाकडे अनेक मागण्या प्रलंबीत असून, त्या पूर्ण होत नाही.त्यामुळे कर्मचार्यांनमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे, त्यामुळे आत्महत्येसारखे पाऊली उचलली जात असल्याचे सांगितले.
——-