महाराष्ट्र नाभिक महामंडळचा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपास पाठिंबा
अहमदनगर प्रतिनिधी – विजय मते
एस.टी.कर्मचार्यांचा संप हा त्यांच्या रास्त मागण्या मान्य करण्यासाठी असून,हक्कासाठी लढा देणे हा संविधानिक अधिकार आहे,असे असतांना शासनाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन आपमान केला आहे.
एस.टी.चा चालक-वाहकांना रस्त्यावर रोजच हातावर मरण घेऊन फिरावे लागते तरी त्यांना कमी पगार का? असा सवाल नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी केले.
तारकपुर बसस्थानकात सुरु असलेल्या कर्मचार्यांचा संपास पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाने आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन सहानुभूती दर्शविली. संघटनेला पाठिंबा पत्र देऊन तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, हा लढा यशस्वी होईल,अशी ग्वाही श्री.भुजबळ यांनी यावेळी दिली.
यावेळी नाभिक महामंडळाच्या महिला जिल्हाध्यक्षा वनिता बिडवे, बापूसाहेब औटी, रमेश बिडवे, निलेश पवळे, विशाल सैंदाणे, श्रीपाद वाघमारे, योगेश पिंपळे, आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री.भुजबळ पुढे म्हणाले, एस.टी. कर्मचार्यांची प्रमुख मागणी महाराष्ट्र शासनामध्ये विलिनिकरण व्हावे, वेतन वेळेवर मिळावे, कोरोना काळात आत्महत्या केलेल्या कर्मचार्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत मिळावी व वारसांना सरकारी नोकरीत घ्यावे.या मागण्या रास्तच आहेत.
कमी पगारात १२-१२ तास ते काम करतात.सणा वाराला कधी ते घरी नसतात.महागाईच्या काळात कमी पगारात काम करणे म्हणजे उपाशी राहण्याची वेळच त्यांच्यावर आली आहे.
अशा या परिस्थितीत शासनाने तातडीने त्यांच्या मागण्या मान्य करुन त्यांना न्याय द्यावा, असे श्री.भुजबळ यांनी आपल्या भाषणात सांगितले.
पाठिबा पत्र देतांना एस.टी.चे कर्मचारी संजय देशपांडे, दिलावर खान, जयदेव हेंद्रे, उषा उदावंत, शितल भिंगारदिवे, हाळगावकर मॅडम, वाटाडे मॅडम आदिसंह नाभिक महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.