ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा जपून ठेवण्याची सर्वांची जबाबदारी – ना.आदिती तटकरे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर प्रतिनिधी – राज्य शासन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध असून, नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेबाबत प्रश्न निर्माण झाले होते, परंतु महाराष्ट्र शासनाने उत्कृष्टपणे कोरोनाची परिस्थिती हाताळली आहे. आता जनजीवन सुरळीत होत आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे. नगरचे ऐतिहासिक वस्तू संग्राहलय हे आपल्या थोर पुरुषांच्या कर्तुत्वाची आठवण करुन देणारे आहे. या संग्रहालयातून पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळणार आहे. आज संग्रहालयाचे झालेले नुतनीकरणाचे काम उत्कृष्ट असून, ऐतिहासिक वस्तुंची मांडणी आणि त्यावर केलेल्या प्रकाश योजनेची सोय त्यामुळे  या ऐतिसिक वस्तू अधिक उठून दिसत आहे. हा अनमोल ठेवा जपून ठेवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे, असे प्रतिपादन पर्यटन राज्यमंत्री ना.आदिती तटकरे यांनी केले.

     पर्यटन राज्यमंत्री ना.आदिती तटकरे यांनी ऐतिहासिक वस्तू संग्रहालय येथे भेट दिली असता, त्यांचे सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाच्यावतीने स्वागत उप अभियंता जगदीश काळे यांनी केले. याप्रसंगी आ.संग्राम जगताप, शाखा अभियंता अरुण सोनवणे, अशोक वडे, बाळू ठोसर, ओंकार वडे, निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित, संग्रहालयाचे संतोष यादव आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी उपभियंता जगदीश काळे यांनी ना.आदिती तटकरे यांना नुतणीकरण कामाची माहिती दिली. अशोक वडे यांनी सर्वांचे आभार मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!