सोमनाथ बनकर यांच्याकडून विद्यार्थीनीला सायकल भेट.
अहमदनगर प्रतिनिधी – विक्रम लोखंडे
महानगरपालिका प्राथमिक शाळा ओंकारनगर केडगाव अहमदनगर शाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.शालेय परिसरातून प्रभातफेरी काढण्यात आली. राष्ट्रीय सायकलपटू व केडगाव येथील भैरवनाथ सायकल सेंटरचे मालक सोमनाथ बनकर यांच्या हस्ते शाळेत झेंडावंदन करण्यात आले.
यावेळी सुवर्णराज ट्रेडर्सचे राजेंद्रसेठ कटारिया,पित्रोडा फर्निचरचे परेशसेठ पित्रोडा,आशा गायके,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कवित वाघमारे, उपाध्यक्ष सविता लोखंडे,सदस्य ज्ञानेश्वर पाडळे, कविता वर्तले, मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, सहशिक्षक शिवराज वाघमारे,सहशिक्षिका वृषाली गावडे तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
यावेळी भैरवनाथ सायकल सेंटरचे मालक सोमनाथ बनकर यांच्याकडून ओंकारनगर शाळेतील वैष्णवी रविंद्र खोडके या विद्यार्थीनीला सायकल भेट देण्यात आली.
सोमनाथ बनकर यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम राबवला आहे.शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थीनीला सायकल भेट देवून तिच्या पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर केला आहे.तसेच मी या विद्यार्थीनीला सर्व शैक्षणिक साहित्य देतो,असे सुवर्णराज ट्रेडर्सचे संचालक राजेंद्रसेठ कटारिया म्हणाले.
ओंकारनगर शाळेतील विद्यार्थी नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभागी होतात.त्यामुळेच ओंकारनगर शाळेने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले आहे,असे पित्रोडा फर्निचरचे परेशसेठ पित्रोडा म्हणाले.
विद्यार्थ्यांनी आपले आईवडील व शिक्षक यांचा नेहमी आदर करावा.जे विद्यार्थी आपल्या आईवडिलांचा व गुरुजनांचा आदर करतात ते आपल्या जीवनात यशस्वी होतात.जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्व प्रकारच्या कष्टाची तयारी ठेवा.आपण दरवर्षी ओंकारनगर शाळेतील एका होतकरू व गरजू विद्यार्थ्याला सायकल भेट देऊ,असे भैरवनाथ सायकल सेंटरचे सोमनाथ बनकर म्हणाले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्राप्त न्युट्रीटीव स्लाइसचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांनी केले तर सहशिक्षक शिवराज वाघमारे यांनी आभार मानले.