नेवासा फाटा (प्रतिनिधी) – काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड यांच्या नेवासा फाट्यावरील जनसंपर्क कार्यालयास काँग्रेसचे नेते व विधान परिषदेचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.
आमदार डॉ.तांबे पक्षीय कामानिमित्तच्या दौऱ्यादरम्यान नेवासा फाटा येथे आले असता त्यांनी कमलेश गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयास आवर्जुन सदिच्छा भेट दिली.आमदार डॉ.तांबे यांचा गायकवाड यांनी यावेळी यथोचित सत्कार केला.यावेळी त्यांच्यासमवेत आलेल्या सुभाष गुंजाळ यांचाही काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुदामराव कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार डॉ.तांबे यांनी गायकवाड यांच्या कार्याची आपुलकीने माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे,कला व सांस्कृतिक विभागाचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर कडू,मिडीया प्रमुख सचिन बोर्डे,कृषी विभाग प्रमुख साहेबराव पवार, तालुका सरचिटणीस प्रवीण तिरोडकर,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर भणगे,मुकींदपूरचे माजी सरपंच निपुंगे,अॅड. कल्याण पिसाळ,बबलू साळवे,आकाश साळवे, संकेत वाघमारे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.