मुकादम बडे बंधूच्या डोळ्यात आनंदाश्रू ; पोलीस निरीक्षक अनिल कटके व त्यांच्या टीमचा केला सत्कार
अहमदनगर (७ ऑगस्ट २०२२)
२८ जून २०२२ रोजी संत तुकाराम साखर कारखाना येथुन संतोष शहादेव बढे ( वय ३६ रा . भिलवडे ता . पाथर्डी ) आणि त्यांचे भाऊ बबन बढे असे दोघे सख्खे भाऊ कामाचे एकूण सात लाख ६० हजार रूपये रोख रक्कम पाथर्डी कडे घेऊन जात असताना रस्ता लुटारूंनी पाळत ठेवून संतोष आणि बबन या दोघा भावांना करंजी घाटामध्ये अडवून मारहाण केली आणि रोख रक्कम लुटली.
या संदर्भात पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना तपासा संदर्भात सूचना दिल्या होत्या.त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी बारकाईने सर्व बाबीचा तपास करून यातील पप्पू दराडे पांगरी पिंपळगाव ता पाथर्डी याने याच्या साथीदारासह ही घटना केल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.
पोलिसांना रात्री उशिरा माहिती मिळाली की पप्पू दराडे हा त्याच्या राहत्या घरी आलेला आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले प्रथम त्यांनी गुन्हा कबूल केला नव्हता परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अधिक विश्वासामध्ये घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.आरोपी प्रवीण उर्फ पप्पू दराडे,अंबादास नारायण नागरे, तात्याबा बापू दहिफळे,दत्तू बाबादेव सातपुते अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना मोठ्या सिथाफीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती.
फिर्यादी बडे कुटुंबीय दोघे भाऊ ऊसतोड कामगार आहेत . त्यांच्या कष्टांचे पैसे लुटारूंनी लुटले आहेत . इत्यादी सर्व बाबी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके ,पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर . पोलीस निरीक्षक अनिल कटके साहेबांनी जातीने लक्ष घालून तपासाची चक्रे गतीने फिरवली आणि तपास पूर्ण करून लुटलेली रक्कम परत मिळवून दिली.
रक्कम मिळाल्यानंतर दोघा भावांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले.पाथर्डी तालुक्यातील भिलवडे येथील फिर्यादी बबन बढे व संतोष बढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे आदी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याचा मनोदय व्यक्त केला.पोलीस विभागाच्या वतीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी संतोष बढे . बबन बढे आणि भिलवडे ग्रामस्थ यांच्याकडून सत्काराचा स्वीकार केला.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पवार,पोहेकॉ/ मनोहर शेजवळ, पोहेकॉ/संदीप घोडके,पोलीस नाईक शंकर चौधरी,पोना/ रविकिरण सोनटक्के,पोना/ दीपक शिंदे,पोना/लक्ष्मण खोकले,पोकॉ/ योगेश सातपुते,पोकॉ/सागर ससाने,पोकॉ/ संतोष लोंढे,पोकॉ/ शिवाजी ढाकणे ,पोकॉ/ मेघराज कोल्हे,चालक पोहेकॉ संभाजी कोतकर अदी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला .सत्कार प्रसंगी सुभाष बढे , ललित बढे , सुरेश बढे , उपसरपंच अमोल बढे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.तपासासाठी भिलवडे गावचे सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य आणि इतर ग्रामस्थ या सर्वांनीच मदत केली.
जेव्हा माझ्या सहकाऱ्यांसह आम्ही आमचे कर्तव्य पार पाडतो तेव्हा जर आमच्या कामगिरीमुळे एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले तर त्याचाच आनंद आम्हाला सर्वस्वी असतो –
–अनिल कटके,पोलिस निरीक्षक अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा
पोलीस विभागाच्या दबंग कामगिरीमुळे आम्हाला खूप मोठा आधार मिळाला आहे. आमचं होत्याच नव्हत झालं होतं . पोलिसांच्या कामगिरीवर आम्ही खूप समाधानी आहोत
— बबन बढे-ऊसतोड कामगार