करे यांच्या धाडसाचे नेवासकरांना अप्रूप

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नेवासा (प्रतिनिधी) – जीव धोक्यात घालून गंभीर जखमी अवस्थेतही डिझेल चोरांना सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद करणाऱ्या पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या धाडसाचे नेवासकरांना मोठे अप्रूप झाल्याचे दिसून येत असून तालुक्यातून त्यांच्यावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,नगर-औरंगाबाद महामार्गावर उभ्या वाहनांतून डिझेल चोरणारी टोळी कार्यरत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.त्याप्रमाणे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास काही लोक डिझेल चोरी करत असल्याची खबर नेवासा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष तसेच धाडसी समजले जाणारे पोलीस निरीक्षक विजय करे यांना समजली.चोरटे सावध होऊ नये यासाठी त्यांनी स्वतःसह पोलीस पथक साध्या वेशात आणि साध्या वाहनातून गस्त घालण्यासाठी गेले.

त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलासमोर काही लोक त्यांना वाहनांतून डिझेल चोरताना आढळून आले.साध्या वाहनांतून व साध्या कपड्यांवर असूनही चाणाक्ष चोरट्यांनी हे पोलीस पथक असल्याचे अचूक हेरले. पोलिसांच्या कचाट्यात सापडू नये यासाठी या चोरट्यांच्या टोळीतील एकाने त्यांच्याजवळील चारचाकी वाहन सुरू करून साथीदारांसह पळून जाण्यास सुरुवात करताच पोलीस निरीक्षक करे त्यांच्या वाहनाला आडवे झाले.त्यावेळी या चोरट्यांनी थेट करे यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करत भरधाव वेगाने नेवासा फाट्याच्या दिशेने निघून गेले. वाहनांची जोराची धडक बसून बॉनेटवरून फेकले गेल्याने पोलीस निरीक्षक करे जबर जखमी झाले.

आपले सहकारी चोरट्यांचा पाठलाग करण्याऐवजी आपल्याला सावरण्यासाठी धावपळ करत असल्याचे पाहून त्यांनी पथकाला चोरट्यांचा पाठलाग करण्याचा आदेश दिला. स्वतः गंभीर जखमी अवस्थेत असतानाही त्यांनी पोलीस पथकासह मध्यरात्री सिनेस्टाईल थरारक पाठलाग सुरू केला. चोरट्यांनी स्वतःला वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु गुन्हेगारांची कुवत तसेच मानसिकतेचा पुरेपूर अभ्यास असलेल्या करे यांनी अखेर त्यांना जेरबंद केलेच.त्यातील काही अंधाराचा फायदा उचलून पळून जाण्यात यशस्वी झाले असले तरी त्यांचा म्होरक्या हाती लागला आहे.

चोरटे पुरेपूर जेरबंद करून त्यांची रवानगी कोठडीकडे केल्यानंतर पोलीस निरीक्षक करे यांनी आपल्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करून स्वतःवरील उपचारांसाठी दवाखान्यात दाखल झाले.स्वतःला तातडीने उपचारांची गरज असतानाही त्याची पर्वा न करता कर्तव्यास प्राधान्य देऊन ते पूर्ण झाल्यानंतर सहकाऱ्यांचेही मनोबल उंचावून मगच स्वतःवरील उपचारांना प्राधान्य देण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीने नगर जिल्हा पोलीस दलासह तालुक्यातील नागरिक भारावून गेले आहेत.

पोलीस निरीक्षक करे यांच्या धाडसाचे विशेषत: नेवासकारांना मोठे अप्रूप वाटत असून त्याबद्दल त्यांचा लवकरच विविध सामाजिक, राजकीय संस्था,संघटनांच्या वतीने सत्कार केला जाणार आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!