कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
कर्जत डॉकटर्स असोसिएशन च्या तालुकाध्यक्षपदी डॉ राजेश तोरडमल यांची बिनविरोध निवड झाली आहे.या निवडीसाठी मावळते अध्यक्ष डॉ मधुकर काळदाते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.त्या बैठकीत अध्यक्षपदासाठी एकमेव नाव आल्याने डॉ राजेश तोरडमल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी कर्जत शहराध्यक्ष डॉ प्रकाश भंडारी ,मिरजगाव शहराध्यक्ष डॉ पंढरीनाथ गोरे,राशीन शहराध्यक्ष डॉ बाळासाहेब कानगुडे,डॉ.मधुकर कोपनर, डॉ विजय चव्हाण,डॉ सुभाष सूर्यवंशी,डॉ औदुंबर गायकवाड,डॉ संदीप काळदाते,डॉ युवराज कर्पे, डॉ मंदार काळदाते,डॉ राम तोरडमल,डॉ.संजय कंक,डॉ लक्ष्मण जांभळे, राष्ट्रवादी डॉकटर्स सेल चे डॉ चंद्रकांत कोरडे, डॉ श्रीकांत फाळके,डॉ सुधीर सुद्रीक,डॉ दादासाहेब बरबडे,डॉ प्रमोद जगताप,डॉ विलास त्रिवेदी,डॉ नवनीत निंबोरे,डॉ.दयानंद पवार आदींसह सर्व सदस्य उपस्थित होते.
डॉ मधुकर काळदाते म्हणाले संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी डॉ राजेश तोरडमल यांच्या सारख्या अभ्यासू,कर्तबगार आणि दूरदृष्टी च्या सहकाऱ्यांला संधी मिळाली आहे.
डॉ राजेश तोरडमल म्हणाले गेली अनेक वर्षे ग्रामीण भागात मी वैद्यकीय सेवा बजावीत आहे.वरीष्टांचे मार्गदर्शन आणि संमवयीन सहकार्याने मिळालेल्या संधीचे सोने करील.
या वेळी डॉ मधुकर काळदाते,डॉ संदीप काळदाते,डॉ.विनायक जगताप,डॉ सुभाष सूर्यवंशी, डॉ विजय चव्हाण,डॉ विलास त्रिवेदी यांची भाषणे झाली.
प्रास्ताविक डॉ युवराज कर्पे यांनी केले तर आभार डॉ मधुकर कोपनर यांनी मानले.सूत्रसंचालन डॉ चंद्रशेखर मुळे यांनी केले.